शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सीताबर्डीत पोलीस हॉकर्समध्ये वाद

By admin | Updated: February 21, 2017 02:04 IST

अतिक्रमणविरोधी कारवाई करणाऱ्या पोलिसासोबत वाद झाल्यानंतर एका सहायक पोलीस निरीक्षकाने चप्पल विक्रेत्याला भररस्त्यावर बदडले.

तरुणाला मारहाण : आरोप-प्रत्यारोपाने तणाव नागपूर : अतिक्रमणविरोधी कारवाई करणाऱ्या पोलिसासोबत वाद झाल्यानंतर एका सहायक पोलीस निरीक्षकाने चप्पल विक्रेत्याला भररस्त्यावर बदडले. सीताबर्डीतील गांधीजींच्या पुतळ्याजवळ सोमवारी दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी अमिनुद्दीन बसुरीद्दीन चव्हाण (वय २७) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार घेण्यास नकार दिल्याने सीताबर्डीतील हॉकर्स संतप्त झाले होते. अमिनुद्दीन हा सीताबर्डीत रस्त्यावर चपला विकतो. दुपारी १.२० च्या सुमारास वाहतूक शाखेचे हवालदार अजयसिंग विजयसिंग ठाकूर (वय ४७) हे आपल्या सहकाऱ्यांसह अतिक्रमण हटाव कारवाई करीत असताना त्यांचा अमिनुद्दीन आणि त्याच्या दोन साथीदारांसोबत वाद झाला. त्यानंतर ठाकूर यांनी सीताबर्डी ठाण्यात माहिती दिली. ठाण्यातून आलेल्या एका सहायक पोलीस निरीक्षकाने अमिनुद्दीनला रस्त्यावरून बदडत ठाण्यात नेले. यामुळे बाजारात तणाव निर्माण झाला. मोठ्या संख्येत हॉकर्स पोलीस ठाण्यात पोहचले. तेथे सहायक पोलीस निरीक्षक येलकेलवार यांनी ठाकूरच्या तक्रारीवरून अमिनुद्दीन आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपी अमिनुद्दीनला अटक करण्यात आली. ठाण्यात पोहचलेल्या हॉकर्स संघटनेचे कुणाल यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी मात्र त्याला नकार दिला. यामुळे हॉकर्समध्ये तणाव निर्माण झाला. मोठ्या संख्येत ठाण्यासमोर जमलेले हॉकर्स पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, ही मागणी घेऊन सायंकाळपर्यंत उभे होते. (प्रतिनिधी)