शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ज्येष्ठ संपादक वामन तेलंग यांचे देहावसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 10:19 IST

दै. तरूणभारतचे माजी संपादक, वि.सा.संघाचे कार्याध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह वामनराव तेलंग यांचे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: दै. तरूणभारतचे माजी संपादक, वि.सा.संघाचे कार्याध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह वामनराव तेलंग यांचे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक  निधन झाले. रात्री दहाच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटत होते म्हणून इस्पितळात नेण्यात आले. तेथे उपचारापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.तरूण भारताच्या रविवारच्या पुरवणीच्या त्यांनी केलेल्या संपादनाच्या निमित्ताने विदर्भातील आजच्या कितीतरी आघाडीच्या लेखकांना त्यांनी त्यावेळी लिहिते केले. गुणग्राहकता ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचाच भाग असल्याने अनेक गुणी लेखक त्यांनी शोधून शोधून उभे केले.तरूण भारताला ग.त्र्यं.माडखोलकरांनी दिलेली वाङ्म्यीन प्रतिष्ठा आणि अभिरूची यांचे जोपासन व संवर्धन करणाऱ्या या परंपरेला व त्या निमित्ताने विदर्भातीलही पत्रपरंपरेला ज्यांनी समृद्धी बहाल केली त्यात वामन तेलंग ही होते.वामनप्रभू या संयुक्त नावाने प्रभाकर सिरास यांच्या सोबत केले गेलेले त्यांचे कथालेखन विदर्भातील ज्येष्ठांच्या अजूनही स्मरणात आहे.त्यांचे स्वत:चे लेखन,परीक्षण, इ. हे तिरकस शैलीने पण संबंधित व्यक्ती , कृती , प्रसंग इ.चे कोणतीही भीडमुर्वत न बाळगता केलेले परखडपरीक्षण असायचे. लेखनातील त्यांची ती शैली त्यांच्या व्यक्तिमत्वाचीही निदर्शक होती. कोणाला काय वाटेल हा त्यांच्या लिहिण्या- बोलण्याचा निकष कधीच नव्हता. विदर्भ साहित्य संघाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.नवोदितांना लिहितं करणारा संपादकएक अत्यंत प्रसन्न आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि नवोदित लेखक लेखिकांना प्रोत्साहन देऊन नावारुपाला आणणारा वामनरावांसारखा दुसरा संपादक झाला नाही. विदर्भात आज ज्यांची नावे मोठी आहेत ते सगळे साहित्यिक वामनरावांनी त्यांच्या संपादकीय कारकीर्दीत प्रत्यक्ष मार्गदर्शन करून घडवले आहेत. त्यांनी कुणालाही नाउमेद केले नाही आणि प्रत्येकाची प्रतिभा फुलती राहील असेच संबंध त्यांच्याशी राखले. ललित लेखन जे माझ्या हातून घडलं त्याला कारणसुद्धा वामन तेलंग हेच आहेत.सुरेश द्वादशीवार, माजी संपादक, लोकमत नागपूर

टॅग्स :Deathमृत्यू