गोकुल खाण परिसरातील घटना : ‘रोप’ तुटल्याने क्रेनखाली दबलेलोकमत न्यूज नेटवर्क नांद : चिखलात फसलेला कोळसा घेऊन जाणारा ट्रक बाहेर काढत असताना क्रेनचा ‘रोप’ तुटला आणि क्रेन उलटली. शेजारी उभे असलेले वेकोलिचे दोन अधिकारी या क्रेनखाली दबल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच बाहेर काढून उपचारासाठी उमरेडला नेत असताना दोघांचाही वाटेतच मृत्यू झाला. ही घटना भिवापूर तालुक्यातील नांद नजीकच्या पिरावा गावालगत असलेल्या वेकोलिच्या गोकुल खाण परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. इंद्रजित त्रिपाठी (५२) व जंग सिंग (६२) अशी मृत अधिकाऱ्यांची नावे आहेत. इंद्रजित त्रिपाठी हे वेकोलिच्या कॉलरी खाणीत तर जंग सिंग हे करमजित खाणीत व्यवस्थापक होते. वेकोलिच्या गोकुल खाणीतून वर्षभरापूर्वी कोळशाच्या उत्पादनाला सुरुवात करण्यात आली. या खाणीतील कोळसा ट्रकद्वारे वाहून नेला जातो. या खाणीतून रोज १०० पेक्षा अधिक ट्रक कोळसा घेऊन उमरेडच्या दिशेने जातात. दरम्यान, रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ओआर-१५/पी-८२०२ क्रमांकाचा ट्रक कोळसा घेऊन खाणीतून बाहेर पडला आणि उमरेडकडे जायला निघाला. चालकाने चहा पिण्यासाठी हा ट्रक गोकुल खाणीच्या कार्यालयासमोरच्या रोडलगत उभा केला आणि जवळच असलेल्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेला.
वेकोलिच्या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू
By admin | Updated: June 12, 2017 02:27 IST