आॅनलाईन लोकमतनागपूर : तूर आणि वालाच्या वेलीवर कीटकनाशक (विष) फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. उमेश नीळकंठराव पौनीकर (वय ५०) असे मृताचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.हिंगणा, एमआयडीसी परिसरातील कारखान्यात उमेश काम करायचा. राणी तलावाजवळच्या पंचशीलनगरात तो राहत होता. घराच्या आजूबाजूला असलेल्या जागेत त्याने छोटीशी फुलबाग तयार केली होती. येथेच त्याने तूर, वालांच्या शेंगांची वेल लावली होती. बुधवारी त्याने सलूनमध्ये वापरल्या जाणाºया प्लास्टिकच्या स्प्रे मधून तुरीवर आणि वालाच्या वेलीवर विषारी कीटकनाशक फवारले. त्यानंतर तो जेवण करून आराम करू लागला. सायंकाळी त्याला मळमळ, ओकाºयाचा त्रास सुरू झाला. प्रकृती ढासळल्यामुळे घरच्यांनी त्याला हिंगण्याच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याला विषबाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर शर्थीचे उपचार सुरू केले. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. घरच्या मंडळींकडून डॉक्टरांना आणि डॉक्टरांकडून एमआयडीसी पोलिसांना विषारी औषध फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे उमेश पौनीकरचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याने एकच खळबळ निर्माण झाली. पोलिसांनी मंदा सुधाकर किरेकर (वय ३८) यांच्या सूचनेवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
नागपुरात किटकनाशकाची फवारणी करताना इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 20:55 IST
तूर आणि वालाच्या वेलीवर कीटकनाशक (विष) फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
नागपुरात किटकनाशकाची फवारणी करताना इसमाचा मृत्यू
ठळक मुद्देघराच्या आवारातच ‘त्याने’ फुलवली होती फुलबागशर्थीच्या उपचाराला अपयश