शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फाशी की जन्मठेप?

By admin | Updated: February 3, 2016 03:02 IST

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या लकडगंजच्या छाप्रूनगर गुरुवंदना सोसायटी येथील आठ वर्षीय निष्पाप व निरागस बालक युग चांडक याच्या अपहरण-हत्याकांड खटल्यात ....

दवारे आणि सिंगला आज सुनावणार शिक्षायुग चांडक  खून खटला नागपूर : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या लकडगंजच्या छाप्रूनगर गुरुवंदना सोसायटी येथील आठ वर्षीय निष्पाप व निरागस बालक युग चांडक याच्या अपहरण-हत्याकांड खटल्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांचे न्यायालय दोष सिद्ध झालेल्या दोन्ही आरोपींंना उद्या बुधवारी फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावणार आहे. राजेश धनालाल दवारे (२०) रा. वांजरी ले-आऊट कळमना आणि अरविंद अभिलाष सिंग (२४) रा. प्रीती ले-आऊट, नारा रोड जरीपटका, अशी आरोपींची नावे आहेत. दोसरभवन चौकातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांचा मुलगा युग याचे या दोन्ही नराधमांनी खंडणी आणि सूड उगवण्यासाठी १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लकडगंज छाप्रूनगर भागातील गुरुवंदना सोसायटी समोरून जांभळ्या रंगाच्या स्कूटीने अपहरण केले होते. त्याला मोटरसायकलने दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्याजवळ नेले होते. त्याचा गळा दाबून निर्घृण खून केला होता. मृतदेह रेतीमध्ये दाबून पालापाचोळा झाकलेला होता, डोक्यावर मोठा दगड ठेवला होता. २ सप्टेंबर २०१४ रोजी लकडगंज पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली होती. लकडगंज पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाने ५० साक्षीदार तपासले. एकही साक्षीदार फितूर (होस्टाईल) झाला नाही. बचाव पक्षाने सात साक्षीदार तपासले. न्यायालयात दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या १२० - ब (फौजदारी कट), ३६४-ए (खंडणीसाठी अपहरण), ३०२ (हत्या),२०१ (पुरावा नष्ट करणे) हे आरोप सिद्ध झाले. उद्या बुधवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा, अ‍ॅड. मनोज दुल्लरवार, आरोपींच्यावतीने अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय, अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय, अ‍ॅड. राजेश्री वासनिक यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)