याकूबचे नातेवाईक सुन्न सुलेमान व्यथित उस्मानने स्वत:ला कोंडून घेतलेनरेश डोंगरे नागपूरवाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच याकूबभोवती मृत्यूचा पाश आवळण्याचे निर्देश मिळाल्यामुळे याकूब अब्दुल रझाक मेमन (वय ५३) याच्यासकट त्याचे कुटुंबीयही सुन्न झाले आहेत. जन्मदिनीच याकूबला मृत्युदंड दिला जाणार याची कल्पना आल्यामुळे व्यथित झालेल्या सुलेमान मेमनने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना अक्षरश: टाळत मुक्कामी असलेले हॉटेल सोडले. तो हॉटेलमधून कारागृहाकडे जायला निघाला. मात्र मध्येच चालकाला त्याने कार रेल्वेस्थानकावर वळवायला लावली आणि एका कोपऱ्यात कार थांबवायला लावून तो रडला. बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास सुलेमान मेमन मुंबईहून नागपूर विमानतळावर पोहचला. त्याला आधी दुपारी याकूबची भेट होईल, असे सांगण्यात आले होते. नंतर मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर याकूबची भेट होईल, असे कळविण्यात आले. त्यामुळे सुलेमान सीताबर्डीतील एका हॉटेलमध्ये चौथ्या माळ्यावरील रुममध्ये मुक्कामी थांबला. सर्वोच्च न्यायालयाने याकूबच्या याचिकेवर दिलेल्या निकालापाठोपाठ राज्यपालांनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळल्याचे वृत्त वाहिन्यांनी प्रसारित केले. ते बघून सुलेमान सुन्न झाला. दुपारी ४.३० वाजता तो खाली आला. माध्यमांनी त्याला काही प्रश्न केले. मात्र, त्याने बोलण्याचे टाळले. ‘माझा न्यायव्यवस्थेवर, अल्लाहवर पूर्ण विश्वास आहे.’ असे तो म्हणाला. आता काय करणार, हा आणि अन्य काही प्रश्न केले असता ‘प्लीज... लिव्ह मी अलोन’ असे तो जवळपास ओरडतच म्हणाला. त्यानंतर सुलेमान कारागृहाकडे निघाला. मात्र, मधूनच त्याने वाहनचालकाला कार रेल्वेस्थानकाच्या मागच्या प्रवेशद्वारावर न्यायला लावली. तेथे एका कोपऱ्यावर वाहन लावल्यानंतर तो तेथे बराच वेळ रडला अन् नंतर कारागृहाकडे निघाला. दुसरीकडे याच हॉटेलमध्ये मंगळवारपासून मुक्कामी असलेल्या उस्मान मेमनने दुपारी ४.३० ला आपल्यामृत्यूची माहिती मिळालेली व्यक्तीमृत्यू कुणाला सांगून येत नाही. म्हणतात की तो अचानक झडप घालतो. मात्र, याकूब मेमन याला मृत्यू सांगून आला आहे. एक, दोन घटकेपूर्वी नव्हे तर १६ दिवसांपूर्वीच याकूबला मृत्यू येणार असल्याचे कळले. मृत्यूला टाळण्यासाठी त्याने अखेरपर्यंत धडपड केली. गेल्या चार दिवसात आमदार, खासदार, नेते, अभिनेते आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांनी याकूबची फाशी टळावी म्हणून थेट राष्ट्रपतींकडे विनंती अर्ज केले. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींमध्येही मतभिन्नता झाली. एकूणच निर्माण झालेल्या वातावरणामुळे याकूबची फाशी टळते की काय, अशी स्थिती निर्माण झाली. याकूबचेही त्यामुळे मनोबल उंचावले होते. मात्र, मृत्यूपुढे त्याचे काही चालले नाही. बुधवारी सारे मार्ग बंद करून मृत्यू याकूबच्या फाशी यार्डाजवळ पोहचला.
वाढदिवशीच मृत्युदंड
By admin | Updated: July 30, 2015 02:33 IST