शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात गाजलेल्या  खैरलांजी हत्याकांडातील दोषसिद्ध आरोपीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 22:06 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या  खैरलांजी हत्याकांडातील आरोपी विश्वनाथ हगरू धांडे याचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६५ वर्षीय धांडे गेल्या ९ वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होता.देश-विदेशात चर्चेला आलेले खैरलांजी हत्याकांड भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात २९ सप्टेंबर २००६ ला घडले होते. या हत्याकांडाची धग भंडारा, नागपूर, ...

ठळक मुद्देकारागृहात ढासळली प्रकृतीसुपर स्पेशालिटीत झाला मृत्यू नागपूरच्या धंतोली ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

आॅनलाईन लोकमतनागपूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या  खैरलांजी हत्याकांडातील आरोपी विश्वनाथ हगरू धांडे याचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६५ वर्षीय धांडे गेल्या ९ वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होता.देश-विदेशात चर्चेला आलेले खैरलांजी हत्याकांड भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात २९ सप्टेंबर २००६ ला घडले होते. या हत्याकांडाची धग भंडारा, नागपूर, मुंबईसह राज्यातील विविध शहरात पसरली होती. या हत्याकांडामुळे दगडफेक, जाळपोळ, मोर्चे, आंदोलनांनी अवघा महाराष्ट्रच ढवळून निघाला होता. संसदेतही या निर्घृण हत्याकांडाची दखल घेण्यात आली होती. तत्कालीन राज्य सरकारने जनभावना लक्षात घेत जलदगती न्यायालयात या खटल्याची सुनावणी होणार, असे जाहीर केले होते. राज्यभर आंदोलनांचे लोण उसळल्यानंतर सुमारे ७ महिन्यांनी कोर्टात दाखल झालेल्या आणि दीड वर्षे चाललेल्या या हत्याकांडाचा निकाल १५ सप्टेंबर २००८ रोजी लागला. भंडारा न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ११ पैकी गोपाल सक्रू बिंजेवार, सक्रू बिंजेवार, शत्रुघ्न धांडे, विश्वनाथ धांडे, प्रभाकर मंडलेकर, जगदीश मंडलेकर, रामू धांडे आणि शिशुपाल धांडे या आठ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली तर, महिपाल धांडे, धर्मपाल धांडे आणि पुरुषोत्तम तितीरमारे यांना मुक्त केले. उच्च न्यायालयात दोन्ही पक्षातर्फे या शिक्षेच्या संबंधाने अपिल करण्यात आले. त्याचा निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोपाल बिंजेवार आणि शिशुपाल धांडे वगळता अन्य सहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना २५ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथे हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे.दरम्यान, २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेला विश्वनाथ धांडे हा ९ वर्षांपासून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदी क्रमांक सी ७६६९ म्हणून बंदिस्त होता. बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रात्री १० वाजून ४८ मिनिटांनी डॉक्टरांनी धांडेला मृत घोषित केले. ही माहिती गुरुवारी सकाळी धंतोली ठाण्यात कळविण्यात आली. धंतोली पोलिसांनी धांडेच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.धांडे दुसरा मृत आरोपीया हत्याकांडात शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर मृत झालेला धांडे हा दुसरा आरोपी होय, अन्य आरोपींपैकी जगदीश मंडलेकर हा २०१२ मध्ये मृत झाला. मंडलेकर नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत असताना १३ फेब्रुवारी २०१२ ला एका महिन्यासाठी पॅरोलवर खैरलांजी येथे आला होता. त्याला दम्याचा त्रास होता. तो अचानक वाढल्याने त्याच्या पॅरोलचा कालावधी पुन्हा एका महिन्याने वाढविण्यात आला. तो १३ एप्रिलला कारागृहात परत जाणार असताना त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

 

टॅग्स :Deathमृत्यू