शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमन धुर्वे मृत्यूप्रकरण : प्रभारी मुख्याध्यापक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 23:58 IST

देवलापार जुनेवाणी येथील जिल्हा परिषद प्रथमिक शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी अमन चंद्रशेखर धुर्वे याचा शाळेच्या आवारात शुक्रवारी सकाळी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला जबाबदार धरत शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नीलकमल भोयर यांना निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी यांनी शुक्रवारी रात्री जारी केले. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देवलापार जुनेवाणी येथील जिल्हा परिषद प्रथमिक शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी अमन चंद्रशेखर धुर्वे याचा शाळेच्या आवारात शुक्रवारी सकाळी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला जबाबदार धरत शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नीलकमल भोयर यांना निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी यांनी शुक्रवारी रात्री जारी केले. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.अमन धुर्वे, रा. जुनेवाणी, ता. रामटेक हा शुक्रवारी सकाळी शाळेच्या आवारात मित्रांसोबत खेळत असताना त्याचा भिंतीलगत असलेल्या उघड्या अर्थिंगला अनावधानाने स्पर्श झाला आणि जोरात विजेचा धक्क्का लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या शाळेतील वीजपुरवठा थकीत बिलापोटी खंडित करण्यात आल्याने प्रभारी मुख्याध्यापक भोयर यांनी शेजारच्या घरून वीजपुरवठा घेतला होता. त्यासाठी त्याने फेजचा एकमेव वापरला असून, अर्थिंग शाळेतच दिले होते. ती अर्थिंगची तार संभाव्य धोका टाळण्यासाठी पीव्हीसी पाईपमध्ये टाकणे अनिवार्य असताना, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसात ओलाव्यामुळे त्या अर्थिग तारेत वीजप्रवाह प्रवाहित झाला आणि त्यात अमनचा जीव गेला.या सर्व बाबी प्रथमदर्शनी चौकशी स्पष्ट झाल्या. या गंभीर प्रकाराला प्रभारी मुख्याध्यापक नीलकमल भोयर यांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी यांनी प्रभारी मुख्याध्यापक भोयर यांना जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७, कलम - ३, महाराष्टÑ जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४, कलम - २, ३ व अन्वये दोषी ठरवित त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करीत त्यांना चौकशीच्या अंतिम निर्णयापर्यंत निलंबित केले.धामणी येथे राहण्याचे आदेशप्रभारी मुख्याध्यापक नीलकमल भोयर यांना त्यांच्या निलंबनाच्या काळात कुही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या धामणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत राहण्याचे आदेशही शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी यांनी दिले. हा काळ अर्धवेतनी रजा असतो. भोयर यांना निलंबनाच्या काळात खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. तसे केल्यास गैरवर्तणूक मानले जाईल. ही बाब त्यांच्या निर्वाह वेतनावर परिणाम करणारी ठरेल. शिवाय, या काळात त्यांचा निर्वाह भत्ता काढण्याचे आदेश कुही पंचायत समिती प्रशासनाला दिले असल्याचेही शिक्षणाधिकारी वंजारी यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू