शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील ‘अजय’ बिबट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 21:20 IST

महाराजबागेत जन्मलेला, वाढलेला व गेल्या १९ वर्षांपासून प्राणिसंग्रहालयाचा साथी असलेल्या ‘अजय’ नामक बिबट्याचा शनिवारी मृत्यू झाला. नुकताच येथील जाई नामक वाघिणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महाराजबागेतील कर्मचारी व वन्यजीवप्रेमींसाठी हा आठवडाभरातील दुसरा धक्का होय. वयामुळे यकृत निकामी झाल्याने अजयचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देवयामुळे यकृत निकामी झाल्याचे कारण : जाईनंतर दुसरा धक्का

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराजबागेत जन्मलेला, वाढलेला व गेल्या १९ वर्षांपासून प्राणिसंग्रहालयाचा साथी असलेल्या ‘अजय’ नामक बिबट्याचा शनिवारी मृत्यू झाला. नुकताच येथील जाई नामक वाघिणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महाराजबागेतील कर्मचारी व वन्यजीवप्रेमींसाठी हा आठवडाभरातील दुसरा धक्का होय. वयामुळे यकृत निकामी झाल्याने अजयचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.महाराजबागेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार अजय हा चार वर्षांपासून कानामध्ये इन्फेक्शन झाल्याने अस्वस्थ होता. उपचाराने बरा व्हायचा, मात्र हा त्रास त्याला वारंवार उदभवत होता. दरम्यान, चार दिवसांपूर्वी त्याची प्रकृती अधिक खालावली होती. रक्त तपासणी केल्यानंतर कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्याची बाब लक्षात आली. त्यानुसार सलाईनद्वारे कॅल्शियम पुरविण्यात आले, मात्र त्याला मागचा पाय उचलण्यातही त्रास जाणवू लागला. अखेर शनिवारी सकाळी ११.१५ वाजता अजयने शेवटचा श्वास घेतला. दुपारी २ वाजता त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी डॉ. प्रशांत सोनकुसरे, डॉ. रूपाली चर्जन, डॉ. अभिजित मोटघरे आदी उपस्थित होते. यामध्ये त्याचे यकृतही निकामी झाल्याची बाब समोर आली. सोबतच वयानुसार किडनी आणि इतर अवयवांमध्येही बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे डॉ. बावस्कर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दुपारी ३ वाजता महाराजबाग परिसरात अजयवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्राणिसंग्रहालय नियंत्रक डॉ. पार्लावार, डॉ. पोटदुखे, डॉ. जीवतोडे व प्रा. विजय खवले आदी उपस्थित होते.अजय हा १९ वर्षांपूर्वी १३ जून १९९९ रोजी महाराजबागेतच जन्मलेला पाहुणा. गोपाल आणि ज्युलीपासून त्याचा जन्म झाला. तेव्हापासून तो इथेच असल्याने महाराजबागेच्या कर्मचाऱ्यांनाही त्याचा लळा होता. अजय प्राणिसंग्रहालयातील सर्वाधिक वयाचा बिबट होता. सध्या महाराजबागेत सात बिबट वास्तव्यास असल्याचे डॉ. बावस्कर यांनी सांगितले. नुकतेच २९ मार्च रोजी येथील जाई नामक वाघिणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महाराजबाग कर्मचारी व वन्यजीवप्रेमींसाठी हा आठ दिवसातील दुसरा धक्का ठरला आहे.

 

टॅग्स :leopardबिबट्याDeathमृत्यू