शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  प्राणघातक हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:09 IST

प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोनू राजू नायर (वय २५, रा. सदर) याचा मृत्यू झाला. तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षय किशोर कनोजिया (वय २३, रा. मुस्लीम लायब्ररीजवळ, सदर) याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करून अंकिश ऊर्फ गुलाम संजय दुर्गे (वय २४, रा. मरियमनगर) आणि डॉम्निक ऊर्फ सॅव्हिओ अब्राहम (वय २१, रा. सदर) या दोघांना अटक केली.

ठळक मुद्देहत्येचा गुन्हा दाखल : आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोनू राजू नायर (वय २५, रा. सदर) याचा मृत्यू झाला. तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षय किशोर कनोजिया (वय २३, रा. मुस्लीम लायब्ररीजवळ, सदर) याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करून अंकिश ऊर्फ गुलाम संजय दुर्गे (वय २४, रा. मरियमनगर) आणि डॉम्निक ऊर्फ सॅव्हिओ अब्राहम (वय २१, रा. सदर) या दोघांना अटक केली.मोनू आणि कनोजिया चांगले मित्र होते. कनोजियासोबत आरोपी अंकिश आणि डॉम्निकचा गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यांनी एकमेकांवर हल्ले करून पाहून घेण्याची धमकीही दिली होती. काही दिवसांपूर्वी कनोजियाने साथीदारांसह अंकिश आणि डॉम्निकवर हल्ला करून त्यांची धुलाई केली होती. तेव्हापासून कनोजियाचा गेम करण्यासाठी आरोपी संधी शोधत होते. रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास सेमिनरी हिल्सच्या वाय पॉर्इंट परिसरात कनोजिया फोटो शुटींग करीत असल्याचे कळताच आरोपी अंकिश आणि डॉम्निक तेथे पोहचले. त्यांनी कनोजियावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या मोनूवरही घातक शस्त्राचे घाव घालून आरोपी पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मोनूला डॉक्टरांनी मृत घोषित केले. कनोजियावर उपचार सुरू आहेत.नाहक गेला बळीआरोपी अंकिश आणि डॉम्निक हे दोघे कनोजियाचा गेम करण्यासाठी आले होते. त्याच्यावर हल्ला होत असल्याचे पाहून मोनू मदतीला धावला. त्यामुळे आरोपींनी कनोजियासोबतच मोनूवरही घाव घातले. यावेळी मोनूचा एक नातेवाईक असहायपणे हे सर्व बघत होता. दरम्यान, मोनूच्या मृत्यूनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा चार दिवसांचा पीसीआर मिळवला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून