शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘डीबीए’च्या जबाबदाऱ्या निवडणूक समितीकडे हस्तांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:40 IST

सर्व बाजूने टीका सुरू झाल्यामुळे शेवटी सोमवारी सायंकाळी जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) विद्यमान कार्यकारिणीने त्यांच्या सर्व जबाबदाºया निवडणूक समितीकडे हस्तांतरित केल्या. याप्रसंगी अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, सचिव अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्देसर्व पदाधिकारी उपस्थित : आॅक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सर्व बाजूने टीका सुरू झाल्यामुळे शेवटी सोमवारी सायंकाळी जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) विद्यमान कार्यकारिणीने त्यांच्या सर्व जबाबदाºया निवडणूक समितीकडे हस्तांतरित केल्या. याप्रसंगी अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, सचिव अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.ज्येष्ठ वकील अ‍ॅड. के. बी. आंबिलवाडे निवडणूक समितीचे अध्यक्ष असून प्राथमिक सदस्यांमध्ये शैलेश दडिया, पी. के. मिश्रा व अब्दुल बशीर यांचा समावेश आहे. हे चौघे समितीमध्ये अन्य आवश्यक सदस्यांचा समावेश करतील. निवडणूक समितीकडे संघटनेचे सर्व अधिकार आल्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता खऱ्या अर्थाने जिल्हा न्यायालयात निवडणुकीचे वारे सुरू होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक येत्या आॅक्टोबरच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी काही वकिलांनी स्वत:ची उमेदवारी घोषित केली आहे. त्यांनी वैयक्तिकरीत्या व सोशल मीडियावरून प्रचार सुरू केला आहे.मावळत्या कार्यकारिणीचा दोन वर्षांचा कार्यकाळ २२ जानेवारी २०१७ रोजीच संपला आहे. परंतु, ते आतापर्यंत पदावर कायम होते. यापूर्वीची कार्यकारिणीही अशीच वागली होती. त्या कार्यकारिणीने कार्यकाळ संपल्यानंतर तब्बल १८ महिने खुर्च्या सोडल्या नव्हत्या. त्या कार्यकारिणीत अ‍ॅड. सुदीप जयस्वाल अध्यक्ष तर, अ‍ॅड. मनोज साबळे सचिव होते. त्यावेळी संबंधित कार्यकारिणीवर बरीच टीका झाली होती. कोंडी असह्य झाल्यानंतर त्या कार्यकारिणीने निवडणूक जाहीर केली होती. त्यानंतर २३ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल तर, सचिवपदी अ‍ॅड. नितीन तेलगोटे विजयी झाले होते. जिल्हा विधिज्ञ संघटनेला सन्मानजनक इतिहास आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये अंतर्गत राजकारण व वैयक्तिक स्वार्थामुळे संघटनेच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले हे येथे उल्लेखनीय.नवीन सदस्यांची वैधता तपासानिवडणूक जिंकण्यासाठी संघटनेत आपापल्या मर्जीतील नवीन सदस्यांची नोंदणी केली जात आहे. त्या सदस्यांची वैधता तपासण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही मागणी करणाऱ्यांमध्ये बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. अनिल गोवारदीपे, अ‍ॅड. राजेश नायक, अ‍ॅड. रजनीश पोद्दार, अ‍ॅड. किशोर पकाडे, अ‍ॅड. राजेश रानगीरकर, अ‍ॅड. राजेंद्र चौधरी, अ‍ॅड. आर. डी. कोचे, अ‍ॅड. आर. एच. विरसेन आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर