शहरं
Join us  
Trending Stories
1
"कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
5
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
6
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
7
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
8
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
9
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
10
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
11
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
12
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
13
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
14
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
15
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
16
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
17
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
18
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
19
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
20
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   

केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाला दत्तोपंत ठेंगडी यांचे नाव

By admin | Updated: August 28, 2016 02:17 IST

केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाला अखेर भारतीय मजदूर संघाचे संस्थापक व रा.स्व. संघाचे प्रचारक राहिलेले दत्तोपंत ठेंगडी यांचे नाव देण्यात आले आहे.

श्रम मंत्रालयाची मंजुरी : दिल्ली येथील कार्यक्रमात घोषणानिशांत वानखेडे नागपूरकेंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाला अखेर भारतीय मजदूर संघाचे संस्थापक व रा.स्व. संघाचे प्रचारक राहिलेले दत्तोपंत ठेंगडी यांचे नाव देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मागणीबाबतचा प्रस्ताव प्रलंबित होता. आता या मंडळाचे नाव दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार प्रशिक्षण व विकास मंडळ करण्यात आले आहे. केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाची स्थापना १९५८ साली करण्यात आली होती. तेव्हापासून त्याचे मुख्यालय नागपूरला स्थापित करण्यात आले आहे. देशभरातील ५० विभागीय कार्यालय, ९ उपविभागीय कार्यालय आणि ६ झोनल कार्यालयाचे कार्य या मुख्यालयाअंतर्गत चालते. यासोबतच मुंबई येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ वर्कर्स एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून विविध शासकीय आणि खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे काम केले जाते. गेल्या काही महिन्यांपासून नागपूर येथील मुख्यालय दिल्लीला स्थानांतरित करण्याचा प्रयत्न केला जात होता. देशातील एक महत्त्वाची संस्था नागपुरात असल्याने ती स्थानांतरित होऊ नये यासाठी मुख्यालयातील कर्मचारी व विविध संघटनांनी विरोध केला. लोकमतने याबाबत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे मुख्यालय नागपूरलाच राहणार असा निर्वाळा श्रममंत्र्यांनी दिला. दत्तोपंत ठेंगडी यांचे नाव श्रमिक शिक्षाण मंडळाला देण्याचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. विशेष म्हणजे ठेंगडी हे विदर्भातीलच असल्याने आणि त्यांनी आजीवन कामगार हिताचे कार्य केल्याने त्यांचे नाव या मंडळाला देण्यात यावे अशी अनेकांची भूमिका होती. अनेकांनी या प्रस्तावावर आक्षेपही घेतला. मात्र अखेर श्रम मंत्रालयाने मंडळाला दत्तोपंत ठेंगडी यांच्या नावाला मंजुरी दिली. नुकताच नवी दिल्ली येथे झालेल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या उद््घाटन कार्यक्रमात श्रम मंत्रालयातर्फे नामकरणाची घोषणा करण्यात आली. यावेळी लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय आदी उपस्थित होते. दत्तोपंत ठेंगडी हे कामगार संघटनांच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये निर्विवाद मोठे व्यक्तिमत्त्व आहे. कामगारांच्या प्रश्नाबाबत बोलताना व लढताना त्यांच्या मनातील कळकळ नेहमी जाणवायची. हा अमूक पक्षाचा, संघटनेचा असा भेदभाव त्यांनी कधीही केला नाही. देशाच्या व कामगारांच्या हितासाठी कोणतेही चांगले काम करण्यास ते नेहमी पुढाकार घ्यायचे. त्यांनी अनेक लढे लढले आहेत. मात्र एवढी मोठी व्यक्ती असूनही त्यांच्यात असलेला साधेपणा अधिक महत्त्वाचा होता. त्यांच्याकडे आलेल्या व्यक्तीशी ते अतिशय नम्रपणे आणि प्रेमाने बोलत असत. श्रमिक शिक्षण मंडळाला त्यांचे नाव देणे अतिशय चांगला निर्णय आहे. - अमर वझलवार, संचालक, विभागीय कामगार प्रशिक्षण समन्वय समिती, सीबीडब्ल्यूईदत्तोपंत ठेंगडी यांचे कार्यदत्तोपंत ठेंगडी यांचा वर्धा जिल्ह्यात १९२० साली जन्म झाला. त्यांनी नेहमीच कामगारांच्या हितासाठी कार्य केले आहे. विविध कामगार संघटनांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. त्यांनी स्वदेशी जागरण मंच, भारतीय किसान संघ आणि भारतीय मजदूर संघाची स्थापना केली. इंटकच्या सचिवपदाचे कार्य त्यांनी सांभाळले. सोबतच रेल्वे, पोस्ट कामगार संघटनांमध्येही त्यांनी काम केले आहे. ठेंगडी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीवन प्रचारक म्हणून कार्य केले आहे. १४ आॅक्टोबर २००४ ला त्यांचे निधन झाले. काय म्हणतो कायदामाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने २००३ साली नाव देण्यासंदर्भात कायदा केला होता. या कायाद्यानुसार कोणत्याही राष्ट्रीय संस्थेचे एखादे ठोस कारण असल्याशिवाय नाव बदलविता येत नाही. ज्या व्यक्तीचे नाव संस्थेला द्यायचे असेल ती व्यक्ती राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली असावी व संबंधित संस्थेच्या कार्याशी ते जुळलेले असावे. हा नामबदलाचा प्रस्ताव संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या संमतीने कॅबिनेट सचिवामार्फत पंतप्रधान यांच्या मंजुरीसाठी देण्यात यावा आणि पंतप्रधानांच्या मंजुरीनंतरच नाव बदल करणे शक्य आहे.