शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

डसॉल्ट-रिलायन्सचा ऐतिहासिक करार; नागपूरमध्ये होणार जागतिक दर्जाचं विमान उत्पादन

By शुभांगी काळमेघ | Updated: June 18, 2025 20:17 IST

भारताची उड्डाण क्षमता वाढली : नागपूर बनणार जेट निर्मिती केंद्र

नागपूर : पॅरिसमध्ये पार पडत असलेल्या एअर शो दरम्यान, डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड यांच्यात फाल्कन २००० जेट विमानांच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक करार करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे ही विमाननिर्मिती प्रथमच फ्रान्सच्या बाहेर, थेट भारतात नागपूरच्या मिहान औद्योगिक परिसरात होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कराराचे स्वागत करत, तो ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.

नागपूर हा सध्या सौर ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असतानाच, या करारामुळे तो देशाच्या हवाई आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या करारानंतर भारत फाल्कन २००० जेटसारख्या प्रगत विमाने तयार करणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, ब्राझील यांच्यासोबत सामील होणार आहे.

डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड (DRAL) हे नागपूरमधील उत्पादन केंद्र ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. फाल्कन २००० व्यतिरिक्त फाल्कन 8X आणि 6X विमानांचे असेम्ब्ली कार्यही याच ठिकाणी पार पडेल. २०२८ पर्यंत नागपुरात पहिले ‘मेड इन इंडिया’ फाल्कन जेट तयार होईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

या करारामुळे हजारो तंत्रज्ञ आणि अभियंत्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, यामुळे नागपूर औद्योगिकदृष्ट्या आणखी सक्षम होईल. डसॉल्ट एव्हिएशन ही जगभरात ओळखली जाणारी विमाननिर्माता कंपनी असून, त्यांनी आतापर्यंत १०,००० हून अधिक नागरी आणि लष्करी विमाने तयार केली आहेत आणि सुमारे ९० देशांमध्ये त्यांचा पुरवठा केला आहे. राफेल लढाऊ विमानामुळे चर्चेत असलेल्या डसॉल्टकडून आता नागपूरसारख्या शहरात अशी गुंतवणूक होणे, हे निश्चितच गौरवास्पद आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संधीचे स्वागत करताना सांगितले की, “नागपुरात संरक्षण उत्पादनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. हा करार त्या दिशेने एक मैलाचा दगड ठरेल.”

टॅग्स :nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस