शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

रोज अंधार अन् वैताग, नागरिकांचा संताप; मेंटनन्सच्या नावावर दररोज वीज बंद

By आनंद डेकाटे | Updated: June 13, 2025 20:25 IST

देखभाल-दुरुस्तीच्या कामांवरच प्रश्नचिन्ह : एकेदिवशी असंतोष उफाळून येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेंटनन्सच्या नावावर दररोज वीज बंद ठेवली जात आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. गुरुवारी रात्री मनीष नगर, नरेंद्र नगर, मानेवाडा इत्यादी भागांत वीजपुरवठा खंडित झाला. यापैकी बहुतेक भागात बुधवारीच देखभालीच्या कामासाठी कित्येक तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दुसऱ्याच दिवशी पुन्हा तांत्रिक बिघाड झाल्याने देखभाल दुरुस्तीच्या कामांवरच प्रश्न उपस्थित होत आहेत.

वीजपुरवठा खंडित होणे हे रोजचेच झाले आहे. जर जोरदार वारा किंवा पाऊस पडला तर वीजपुरवठा खंडित होणे अटळ आहे. आता महावितरणने मान्सूनपूर्व काम सुरू केले आहे. बुधवारी शहरातील मोठ्या भागात वीजपुरवठा बंद करून काम सुरू आहे. वेळेअभावी देखभालीचे काम इतर दिवशीही केले जात आहे. दुसरीकडे, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार थांबत नाहीत. गुरुवारी रात्री चिंचभवन सबस्टेशनची व्हिसल फुटल्याने अंधार पसरला होता. सूत्रांचे म्हणणे आहे की, ज्या एजन्सींना देखभालीचे कंत्राट मिळाले आहे ते त्यांचे काम योग्यरीत्या करत नाहीत. झाडांची योग्य छाटणी केली जात नाही किंवा सांधे घट्ट केले जात नाहीत. या एजन्सींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ज्वाॅइंट उघडत आहेत

केबल बिघाडामुळे अनेक ठिकाणी ज्वाॅइंट टाकून तात्पुरता पुरवठा सुरू करण्यात आल्याचे महावितरणच्या सूत्रांचे म्हणणे आहे. आता हे केबल ज्वाॅइंट उघडत आहेत. विशेषतः गांधीबाग विभागात असे प्रकार अधिक घडत आहेत. वीजपुरवठा खंडित होण्याचे हेदेखील एक मोठे कारण आहे. एकंदरीत, महावितरणच्या हलगर्जीपणाचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.

विकासकामांमुळेही अडचणीविविध एजन्सींकडून सुरू असलेल्या विकासकामांमुळेही वीजपुरवठा खंडित होत आहे. अयोध्या नगरमधील गजानन शाळेजवळ महानगरपालिकेकडून खोदकाम सुरू असल्याने ३३ केव्ही बेसा-उमरेड रोड लाइन तुटली. यापूर्वी महापालिकेच्या विकासकामांमुळे केबल तुटली होती. पारडी-वाठोडा ३३ केव्ही लाइनमध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचप्रमाणे मॉडेल मिलमधील केबल ड्रेनेजच्या कामामुळे खराब झाली होती.

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर