शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

दोन माऊझरसह काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:12 IST

अवैधपणे शस्त्र विकणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन माऊझर, चार काडतूस जप्त करण्यात आले.

ठळक मुद्देचार जणांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कन्हानमध्ये धडक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्ककन्हान : अवैधपणे शस्त्र विकणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन माऊझर, चार काडतूस जप्त करण्यात आले. कन्हान परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.अब्दुल फारुख अब्दुला शेख मंसुरी (२२), मो. नाहीद ऊर्फ हमजा बब्बू सय्यद (२३) दोघेही रा. कांद्री कन्हान, चेतन रमेश कोल्हे (२३, रा. दुर्गानगर, कन्हान, ह.मु. नरसाळा नागपूर) आणि मोहन राजू पनीकर (४२, रा. इंदिरानगर कन्हान) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.फारुख हा कन्हानमध्ये व्हॉटसअ‍ॅपद्वारे शस्त्रास्त्रांचे छायाचित्र पाठवून शस्त्रे विकत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुरुवारी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला छायाचित्र दाखवून त्याबाबत विचारले असता जबलपूर येथून माऊझर आणल्याची कबुली त्याने दिली.तसेच त्याचा साथीदार मोहम्मद नाहीद हा कांद्री झोपडपट्टीच्या मागे माऊझर विक्रीसाठी घेऊन गेल्याचे त्याने सांगितले. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने झोपडपट्टी परिसरात शोध घेतला असता तो संशयास्पदरीत्या आढळून आला. त्यामुळे त्याला ताब्यात घेत विचारपूस केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे माऊझर आणि दोन काडतूस आढळून आले. त्यानंतर चेतनला ताब्यात घेऊन विचारणा केल्यावर त्याने मोहन पनीकरला एक माऊझर विकल्याचे सांगितले. त्यावरून मोहनला ताब्यात घेतले. त्याच्याकडून माऊझर आणि दोन काडतूस जप्त केले.या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध अवैधपणे शस्त्रांस्त्रांची विक्री करण्याचे तसेच शस्त्रास्त्र बाळगल्यावरून भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण कन्हान पोलिसांकडे तपासासाठी देण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, उल्हास भुसारी, पुरुषोत्तम अहेरकर, सहायक फौजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, पोलीस हवालदार जयप्रकाश शर्मा, राजेंद्र सनोडिया, ज्ञानेश्वर राऊत, बाबा केचे, प्रमोद बन्सोड, संतोष पंधरे, मदन आसतकर, नीलेश बर्वे, सूरज परमार, दिलीप लांजेवार, नायक पोलीस शिपाई सुरेश गाते, रामा आडे, शैलेश यादव, पोलीस शिपाई राधेश्याम कांबळे, प्रणय बनाफर, अमोल वाघ, विशाल चव्हाण, नीतेश रोहणकर, चालक साहेबराव बहाळे, अमोल कुथे, महिला शिपाई नम्रता बघे यांनी पार पाडली.