शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

नागपूरच्या धंतोली-रामदासपेठेतील वाहतूक कोंडी सुटणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 23:57 IST

धंतोली , रामदासपेठ येथील सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. परिसरातील नागरिकांनाही आता याचा मोठा त्रास होऊ लागला आहे. यावर महापालिकेने तोडगा काढत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रामदासपेठेतील नऊ एकर जागेवर वाहन तळ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. अटी व शर्तीसह पीकेव्हीनेही जागा देण्याची तयारी दर्शविली आहे.

ठळक मुद्देपीकेव्हीच्या जागेवर पार्किंग : नऊ एकर जागेवर उभारणार वाहनतळ, ८०० चारचाकी व १६०० दुचाकीची व्यवस्था

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : धंतोली , रामदासपेठ येथील सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. परिसरातील नागरिकांनाही आता याचा मोठा त्रास होऊ लागला आहे. यावर महापालिकेने तोडगा काढत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रामदासपेठेतील नऊ एकर जागेवर वाहन तळ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. अटी व शर्तीसह पीकेव्हीनेही जागा देण्याची तयारी दर्शविली आहे.रामदासपेठ तसेच धंतोलीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णालये आहेत. या रुग्णालयात रुग्णाला भेटण्यासाठी येणाऱ्यांची वाहने, रुग्णांच्या नातेवाईकांची वाहने रस्त्यावर उभी केली जातात. याशिवाय रुग्णालयाच्या अ‍ॅम्ब्युलन्सची भर पडली आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी होत असून या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने यावर तोडगा काढण्यासाठी याच परिसरात वाहनतळ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रहाटे कॉलनी ते प्रस्तावित डीपी रोडपर्यंत जागेसंदर्भात पीकेव्हीशी चर्चा सुरु असल्याचे सांगितले जाते. पीकेव्हीने यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे सुचविले आहे. महापालिकेने येथे पार्किंग प्लाझाचा प्रस्ताव मांडला. मात्र पीकेव्हीने त्यांच्या जागेवर पक्के बांधकाम न करण्याची अट घातली. त्यामुळे आता वाहनतळ तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी तब्बल ८०० चार चाकी आणि १६०० दुचाकी वाहने पार्क करता येतील. येथे उद्यानही तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Parkingपार्किंगnagpurनागपूर