शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप; अधिकारी झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 22:00 IST

नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप आहे. हजारो रुग्ण सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे असतानाही महापालिका म्हणत आहे २०३ रुग्ण आहेत. एवढेच नव्हे तर डेंग्यूमुळे एकाचाही मृत्यू झाल्याची पुष्टी मिळालेली नाही. असा हास्यास्पद दावा केला आहे. वास्तविक डेंग्यू मुळे मोठया संख्येने मृत्यू झालेले आहेत. यामुळे महापालिकेच्या मलेरिया-फायलेरिया विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अशी मागणी विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी शनिवारी सर्वसाधारण सभेत केली.

ठळक मुद्देसत्ताधारी-विरोधकांचा मलेरिया-फायलेरिया विभागाच्या कामकाजावर आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप आहे. हजारो रुग्ण सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे असतानाही महापालिका म्हणत आहे २०३ रुग्ण आहेत. एवढेच नव्हे तर डेंग्यूमुळे एकाचाही मृत्यू झाल्याची पुष्टी मिळालेली नाही. असा हास्यास्पद दावा केला आहे. वास्तविक डेंग्यू मुळे मोठया संख्येने मृत्यू झालेले आहेत. यामुळे महापालिकेच्या मलेरिया-फायलेरिया विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अशी मागणी विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी शनिवारी सर्वसाधारण सभेत केली.कावीळ, स्क्रब टायफस प्रकरणातही महापालिकेची भूमिका उदासीन असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक मनोज सांगोळे यांनी केला. डेंग्यूमुळे एकही मृत्यू झालेला नाही. हा दावाच चुकीचा आहे. माजी लेखा परीक्षक महेंद्र सुटे यांच्या मुलाचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला. डेंग्यूचा प्रक ोप नसेल तर जे डॉक्टर या आजाराविषयी भिती पसरवत आहेत. त्यांवर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी सांगोळे यांनी केली.बसपाचे मोहम्मद जमाल म्हणाले, फॉगिंगसाठी प्रभागात मशीन पाठविली जाते. परंतु डिझेल लगेच संपते. बसपाचे जितेंद्र घोडेस्वार यांनीही डेंग्यूचा प्रश्न उपस्थित करून विभागाचा कारभार संशयास्पद असल्याचा आरोप केला. भाजपाचे नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर म्हणाले, पॅथॉलॉजिस्टांच्या संमेलनात सक्करदरा भागात डेंग्यूचा सर्वाधिक प्रकोप असल्याची माहिती देण्यात आली. परंतु महापालिका म्हणते गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. याला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अखेर उपहमापौर दीपराज पार्डीकर यांनी आयुक्तांना या प्रक रणात लक्ष घालून चौकशी करण्याचे निर्देश दिले.थोटे यांची बदलीमलेरिया-फायलेरिया अधिकारी जयश्री थोटे यांची वर्धा येथे बदली करण्यात आली आहे. त्यांना शासनाने प्रतिनियुक्तीवर महापालिकेच्या मलेरिया-फायलेरिया विभागात पाठविण्यात आले होते. त्यांच्या निलंबनाचे अधिकार महापालिकेला नाही.त्यांना परत बोलवण्याचा प्रस्ताव पाठविता येतो. परंतु त्यांची बदली झाली असल्याने यावरील वाद शांत झाला.

टॅग्स :dengueडेंग्यूnagpurनागपूर