शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

नागपूर रेल्वेस्थानकावर घाण आणि दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:07 IST

नागपूरचे रेल्वेस्टेशन वर्ल्ड क्लास बनविण्याचा प्रयत्न होत असताना, रेल्वे स्थानकाच्या बाहेर कचरा, घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. लोकमतच्या टीमने रेल्वेस्टेशन परिसराचा आढावा घेतला असता, प्रशासनाची उदासिनता दिसून आली.

ठळक मुद्देप्रवासी त्रस्त प्राण्यांचाही वावर, कशी होणार वर्ल्ड क्लासकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचे रेल्वेस्टेशन वर्ल्ड क्लास बनविण्याचा प्रयत्न होत असताना, रेल्वे स्थानकाच्या बाहेर कचरा, घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. लोकमतच्या टीमने रेल्वेस्टेशन परिसराचा आढावा घेतला असता, प्रशासनाची उदासिनता दिसून आली.

मुख्य द्वारासमोर पसरली आहे घाणनागपुरात येणारे प्रवासी रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून बाहेर पडतात. मुख्यद्वारासमोरच प्रवाशांना घाण आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो. स्टेशन जवळील रस्त्यावर गटारीचे घाण पाणी वाहत आहे. प्रवाशांना पसरलेल्या गटाराच्या घाण पाण्यातून कसेबसे बाहेर पडावे लागत आहे.

आतमधील गटार सुद्धा तुंबलीलोकमतची टीम रेल्वे स्टेशन समोरील मुख्य द्वाराजवळील पार्किंगच्या परिसरात पोहचली. तिथे वाहनाच्या पार्किंग स्टॅण्डसमोरची गटार तुंबलेली आढळली. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन परिसरातील गणेश टेकडी रोडवरील गटार लाईन सुद्धा बऱ्याच ठिकाणी चोक झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर सतत घाण पाणी वाहत आहे. प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या अगदी समोर रेल्वेस्टेशन परिसरात १०० फुट उंच राष्ट्रध्वजाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते झाले. मात्र या परिसरातील अस्वच्छतेवर कुणाचेच लक्ष गेले नाही.

बगीच्याजवळ बनले शौचालयरेल्वे स्टेशनच्या मुख्य परिसरातील गणेश टेकडी रोडला लागून असलेल्या खाली जागेवर रेल्वे प्रशासनाने सौंदर्यीकरण करून उद्यानाच्या रुपात विकसित केली आहे. येथे स्वच्छतेचे संदेशही दिले आहे. परंतु लोकांनी तिथे शौचालयच बनविले आहे. अशा लोकांवर कारवाईचा सुद्धा प्रयत्न केला जात नाही.

डस्टबिन गायबस्वच्छ शहराचा दावा करणाऱ्या मनपा प्रशासनाने रेल्वे स्टेशनकडे दुर्लक्ष केल्याचे रेल्वे स्टेशन रोडवर पसरलेल्या घाणीवरून दिसून येते. रेल्वे स्टेशन परिसरात भिंतीला लागून डस्टबिन लावण्यात आल्या होत्या. परंतु त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे डस्टबिन गायब झाल्या असून, केवळ स्टॅण्ड उरले आहे. त्यामुळे रस्त्यावरच कचरा पसरलेला आहे.

दोन्ही यंत्रणेचे दुर्लक्षरेल्वे स्थानक परिसरात नियमित सफाईवर प्रशासनाचा जोर नसल्याचे दिसते आहे. आॅटोचालकाबरोबरच स्थानिक दुकानदारांनी सुद्धा तक्रारी केली की, सफाई कर्मचारी येथे नियमित सफाई करीत नाही. सूत्रांच्या मते रेल्वे स्टेशन परिसराच्या बाहेरील जबाबदारी मनपाची आहे. मात्र रेल्वे प्रवाशांना होत असलेल्या त्रासामुळे याची दखल रेल्वे प्रशासन सुद्धा घेऊ शकते. दोन्ही यंत्रणेचे दुर्लक्ष असल्यामुळे समस्या गंभीर होत चालली आहे.

नाक दाबूनच बाहेर पडावे लागतेरेल्वे स्थानकाचे पूर्वेकडील गेटवर सुद्धा घाण आणि कचºयाचे ढीग पसरले आहेत. तसेच प्लॅटफॉर्म नंबर ८ जवळील शौचालयाच्या भागात गटारीचे घाण पाणी साचले असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. प्रवाशांना बाहेर पडताना नाक दाबूनच निघावे लागत आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर