शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीसाठी प्रदूषणाबाबत धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 11:51 IST

उपराजधानीची गणना देशातील ‘ग्रीन’ शहरांत होत असली तरी विविध जागतिक संघटना व संस्थांनी जारी केलेली आकडेवारी भविष्यातील धोक्यांचे संकेत देणारी आहे.

ठळक मुद्दे‘पीएम २.५’च्या प्रमाणात नागपूर राज्यात तिसऱ्या स्थानीनियंत्रणाचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीची गणना देशातील ‘ग्रीन’ शहरांत होत असली तरी विविध जागतिक संघटना व संस्थांनी जारी केलेली आकडेवारी भविष्यातील धोक्यांचे संकेत देणारी आहे. मागील वर्षी ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’च्या अहवालातून ‘पीएम २.५’चे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले होते. ‘एअर व्हिज्युअल’-‘ग्रीनपीस’ने जारी केलेल्या २०१८ च्या अहवालानुसार निर्धारित पातळीहून नागपुरात ‘पीएम २.५’चे (पर्टिक्युलेट मॅटर)प्रमाण फार जास्त आहे. विशेष म्हणजे ‘पीएम २.५’च्या प्रमाणात नागपूरचा राज्यात तिसरा क्रमांक आहे.‘एअर व्हिज्युअल’-‘ग्रीनपीस’ने २०१८ सालातील सर्वात प्रदूषित शहरांची आकडेवारी जारी केली. यानुसार २०१८ साली नागपुरातील वातावरणातील ‘पीएम २.५’चे सरासरी वार्षिक प्रमाण ४६.६ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते. राज्यात मुंबई व औरंगाबादनंतर नागपूरचा तिसरा क्रमांक होता. तर देशात नागपूर ४१ व्या स्थानी होते. २०१७ मध्ये ‘पीएम २.५’चे सरासरी प्रमाण ५६.२ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये ‘पीएम २.५’चे प्रमाण घटले असले तरी निर्धारित पातळीहून हा आकडा अधिकच आहे.

काय म्हणतात ‘डब्लूएचओ’चे आकडेवायुप्रदूषणासंदर्भात ‘पीएम २.५’ हे ‘पीएम १०’पेक्षा जास्त घातक मानण्यात येते. नागपुरातील ‘पीएम २.५’चे प्रमाण २०१३ साली ३३ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते. २०१४ मध्ये हेच प्रमाण ३४ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरवर गेले. तर २०१६ हाच आकडा चक्क ८४ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरवर पोहोचला होता. ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’ची निर्धारित पातळी १० मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतकी आहे. तर भारतात ही पातळी ४० मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतकी आहे. या पातळीहून नागपुरात हे प्रमाण फार जास्त असून संवेदनशील समूहांसाठी हे धोकादायक मानण्यात येते.

काय आहेत ‘पीएम’हवेत असलेले अतिसूक्ष्म कण, धूळ, मातीचे कण, वायू इत्यादींचे मिश्रण होऊन ‘पीएम’ (पर्टिक्युलेट मॅटर) तयार होतात. ‘पीएम २.५’ (पर्टिक्युलेट मॅटर २.५ मायक्रॉन), ‘पीएम १०’ (पर्टिक्युलेट मॅटर १० मायक्रॉन) तसेच ‘एमएसपीएम’ (सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर) अशा ३ श्रेणींमध्ये विभाजित करण्यात येते. ‘पीएम २.५’ ला जास्त धोकादायक मानण्यात येते. याचा आकार २.५ मायक्रोमीटरहूनदेखील लहान असतो. हे सूक्ष्मकण श्वासनलिकेवाटे थेट शरीरात शिरण्याचा धोका असतो.वातावरणासाठी धोकादायक‘पीएम २.५’च्या वाढलेल्या प्रमाणामुळे ‘व्हिजिबिलिटी’वर परिणाम होण्याची शक्यता असते. शिवाय हे कण दूरवर वाहून जाऊ शकतात. या कणांमधील रासायनिक घटकांनुसार तलावांतील आम्लपणा वाढू शकतो. तसेच जमिनीची सुपिकतादेखील धोक्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे ‘अ‍ॅसिड रेन’चे प्रमाणदेखील वाढण्याचा धोका असतो.राज्यातील शहरांतील पीएम २.५ चे प्रमाणशहर                       पीएम २.५ (मायक्रोग्रॅम प्रति                               क्युबिक मीटर)मुंबई                        ५८.६औरंगाबाद                ४७.४नागपूर                      ४६.६पुणे                          ४६.३चंद्रपूर                       ४१.४

टॅग्स :pollutionप्रदूषण