लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उन्हाळ्याची चाहूल लागताच, भांडेवाडी कचरा डम्पिंगचा भडका सुरू झाला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून डम्पिंग यार्डमध्ये सातत्याने आग लागत आहे. शुक्रवारी आगीचा भडका चांगलाच वाढला होता. ऐन दुपारी भांडेवाडीला लागून बीडगाव रोडवर धूर पसरल्याने रस्ता दिसेनासा झाला होता. या विषारी धुरामुळे बीडगाव, तरोडी, साईबाबानगर, भांडेवाडी परिसर व वाठोडा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे.शहरातील संपूर्ण कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये साठविण्यात येतो. उन्हाळ्याच्या दिवसात कचरा वाळल्याने आगीच्या घटना दरवर्षी घडतात. गेल्या तीन ते चार दिवसापासून भांडेवाडीत तुरळक आगी लागत होत्या. शुक्रवारी आगीने चांगलाच भडका घेतला, या आगीमुळे भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरातील वस्त्यांमध्ये आगीचा धूर पसरला आहे. बीडगावकडे जाणाºया रस्त्यावर भर दिवसा धुकंच पसरलं आहे. या धुरामुळे रस्त्यावरील वाहनांच्या अवागमनाला अडथळा होत आहे. धुराचा परिणाम वाहतुकीबरोबरच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे.भांडेवाडीत ढिगाने कचरा साठवला आहे. उन्हाळ्यात वरवर कचरा वाळतो. परंतु आतमध्ये ओलसरपणाच असतो. त्यामुळे कचऱ्याचे विघटन होऊन मिथेन गॅस निर्माण होतो. थोडीजरी ठिणगी लागली की आगीचा भडका होतो. असाच काहीशा प्रकारातून आग लागल्याचे पर्यावरण तज्ञांचे मत आहे. मनपाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. डम्पिंग यार्डमध्ये सर्वच प्रकारचा कचरा साठविला जातो. विशेषत: प्लास्टिकचे प्रमाण अधिक असते. आगीमुळे जो धूर पसरला आहे तो शरीरासाठी घातक ठरतो आहे. जीव गुदमरतो आहे. डोळ्यात जळजळ होत आहे. खोकल्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे.दिनेश बांते, नागरिक, बीडगाव धुराचा प्रभाव आज संपूर्ण बीडगाव परिसराला जाणवला. दुपारी ३ वाजताच्या सुमारास बीडगाव रोडवर धुकं पसरल्याचे चित्र होते. धुरामुळे समोरचा व्यक्ती दिसत नव्हता. वाहनांच्या अवागमनाला अडथळा निर्माण झाला होता. श्वसनालाही त्रास होत आहे.मुन्ना शुक्ला, माजी नगरसेवक दरवर्षी भांडेवाडी परिसरात आगी लागतात. यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. सध्या येथे मनपाचे चार टॅँकर आग विझविण्याचा कामात लागले आहे. पाण्याची नासाडी थांबवायची असल्यास, परिसरातील सिवेज ट्रीटमेंट प्लॅण्टचे पाणी वापरणे गरजेचे आहे. शिवाय कचऱ्याची सायंटिफिकरीत्या विल्हेवाट लावल्यास, कचऱ्यापासून पर्यायी वीज निर्मिती केल्यास आग लागण्याच्या समस्येला आळा बसू शकतो.कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरण तज्ञ
नागपुरातील डम्पिंग यार्डमध्ये लागली भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 21:25 IST
उन्हाळ्याची चाहूल लागताच, भांडेवाडी कचरा डम्पिंगचा भडका सुरू झाला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून डम्पिंग यार्डमध्ये सातत्याने आग लागत आहे. शुक्रवारी आगीचा भडका चांगलाच वाढला होता. ऐन दुपारी भांडेवाडीला लागून बीडगाव रोडवर धूर पसरल्याने रस्ता दिसेनासा झाला होता. या विषारी धुरामुळे बीडगाव, तरोडी, साईबाबानगर, भांडेवाडी परिसर व वाठोडा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे.
नागपुरातील डम्पिंग यार्डमध्ये लागली भीषण आग
ठळक मुद्देपरिसरात पसरला धूर : नागरिक हैराण