शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलचा घातक जैविक कचरा भंगारात

By admin | Updated: May 16, 2017 02:02 IST

वेगवेगळ्या शस्त्रक्रियेनंतर निकामी झालेले शरीरातील अवयव किंवा ट्युमर, इंजेक्शन, आयव्ही बॉटल, प्लास्टर, कापूस, बॅन्डेज, सिरिंज, पेशंटशी संपर्कात आलेल्या ...

विघटन केंद्रापर्यंत पोहचण्यापूर्वीच कचऱ्याची होते विक्री : नागपूरकरांचे आरोग्य धोक्यातसुमेध वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगवेगळ्या शस्त्रक्रियेनंतर निकामी झालेले शरीरातील अवयव किंवा ट्युमर, इंजेक्शन, आयव्ही बॉटल, प्लास्टर, कापूस, बॅन्डेज, सिरिंज, पेशंटशी संपर्कात आलेल्या आणि उपचार करताना वापरलेली प्रत्येक वस्तू ‘बायो-मेडिकल वेस्ट’ (जैविक कचरा) मध्ये मोडते. हा घातक कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्याचा नियम आहे. मात्र विघटन केंद्रापर्यंत पोहचण्यापूर्वीच हा कचरा भंगार व्यावसायिकांना विकला जात असून, यातून होत असलेल्या संसर्गामुळे व आजारांमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सार्वजनिक आरोग्य जपणे व पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी ‘बायो-मेडिकल वेस्ट हॅन्डलिंग रुल्स’अर्थात जैव वैद्यकीय कचरा हाताळणी नियमावली १९९८ मध्ये तयार करण्यात आली. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने २० जुलै १९९८ रोजी अधिसूचना काढून हे नियम जारी केले. यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी जागा, पाणी, रस्ता व वीज पुरवठा करून जैविक कचरा विघटनाचा प्रकल्प उभारावा आणि डॉक्टर व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नियमांचे पालन केले जाते की नाही, याची देखरेख राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावी, असे म्हटले गेले. त्यानुसार महापालिकेने २००४ पासून ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थे’ला ३० वर्षांसाठी सर्व रुग्णालयातून जैविक कचरा गोळा करणे आणि त्याचे विघटन करण्याचे कंत्राट दिले. या संस्थेने जैव कचरा विघटनाचा प्रकल्प भांडेवाडी डम्पिंग स्टेशन येथे उभारला आहे. ही संस्था उपराजधानीतील मेडिकल, मेयो, डागा, महापालिकेच्या इस्पितळांसह खासगी सुमारे ५०० इस्पितळांतून कचरा गोळा करते. या सेवेसाठी ही संस्था प्रत्येक रुग्णालयातील एका खाटेमागे ठराविक शुल्क आकारते. या संस्थेकडून महापालिकेला ‘रॉयल्टी’ही मिळते. ही संस्था प्रामाणिक काम करीत असली तरी काही मेडिकलचे सफाई कर्मचारी ५०-१०० रुपयांसाठी हा जैविक कचरा भंगार व्यावसायिकांना विकतात.अशी होते जैविक कचऱ्याची विक्रीमेडिकलच्या वॉर्डावॉर्डात, शस्त्रक्रिया गृहात, प्रयोगशाळेत व अपघात विभागात रुग्णाने वापरलेले इंजेक्शन, सिरिंज, सलाईनच्या बॉटल्स, रबरी नळ्या, ग्लोव्हज आदी साहित्य लाल रंगाच्या प्लास्टीक पिशवीत जमा करून ठेवल्या जातात तर रुग्णांचे कापलेले अवयव, रक्ताचे बँडेज, कापूस, कपडे हे काळ्या रंगाच्या प्लास्टीक पिशवीत जमा केले जातात. सकाळी ८ वाजता मेडिकलच्या सफाई कामाला सुरुवात होते. त्यावेळी या पिशव्या सफाई कर्मचारी मेडिकलच्या ‘लाँड्री’ विभागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जमा करतात. साधारण ११ वाजेपर्यंत चांगलाच ढीग जमा होतो. त्यावेळी काही ओळखीचे भंगार व्यावसायिक रिक्षा घेऊन येतात. सफाई कर्मचाऱ्याला एका लाल पिशवीच्या मागे ५० रुपये देऊन हव्या तेवढ्या पिशव्या पांढऱ्या रंगाच्या पोत्यात भरतात. साधारण १५-२० मिनिटात अर्धेअधिक प्लास्टिकच्या पिशव्या हातरिक्षाच्या मदतीने भंगार दुकानांकडे रवाना झालेल्या असतात. दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान हा कचरा घेऊन जाण्यासाठी ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थे’चा ट्रक येतो, परंतु तोपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त कचरा भंगारात पोहचलेला असतो. रोज ३० ते ४० प्लास्किटच्या बॅग भंगारात विकल्या जात असल्याची माहिती आहे. झोपडपट्टीत जैविक कचऱ्याचे ढीगशहरातील अनेक झोपडपट्टीत भंगार व्यावसायिकांनी आपले बस्तान मांडले आहे. या भंगार व्यावसायिकांकडे जैविक कचऱ्याचे ढीग नेहमीच दिसून येतात. मात्र याकडे अद्यापही कुणाचेच लक्ष जात नाही. मनपाच्या आरोग्य विभागाला याची माहिती असून यावर ना महानगरपालिकेचा अंकुश आहे ना प्रदूषण नियंत्रण मंडळाचा.