शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

दगड कोसळण्याचा धोका : पाटणसावंगी-वाकी मार्ग बनला मृत्युमार्ग

By admin | Updated: December 29, 2014 02:44 IST

सावनेर मार्गावरील पाटणसावंगी वाकी हे तीर्थस्थळ आहे. श्री ताजुद्दीनबाबा यांच्या पवित्र वाकी दर्ग्यात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी जातात.

मनोज तळवतकर कोराडीनागपूर - सावनेर मार्गावरील पाटणसावंगी वाकी हे तीर्थस्थळ आहे. श्री ताजुद्दीनबाबा यांच्या पवित्र वाकी दर्ग्यात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी जातात. रोजच्या वर्दळीचा हा मार्ग ‘मृत्युमार्ग’ बनलेला आहे. डोंगर खोदून तयार करण्यात आलेल्या या मार्गावरील मोठे दगड कोसळून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वाकी येथे ये-जा करण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे. डोंगर खोदून रस्ता तयार करण्यात आला. या पूर्वी मार्गावर ‘यू-टर्न’ वळणाचा रस्ता होता. त्यामुळे अनेकदा अपघात झाले. यावर पर्याय म्हणून मोठे दगडी पहाड खोदून रस्ता तयार करण्यात आला. त्यानंतर हा मार्ग अधिकच धोकादायक झाला आहे. अत्याधुनिक मशीनच्या साह्याने पहाड खोदण्यात आले. सदरचे खोदकाम व्यवस्थित झाले नसल्याने रस्त्याच्या कडेलाच मोठमोठे दगड आहेत, शिवाय हा रस्ता अतिशय अरुंद आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना दगड कोसळतात की काय असा भास निर्माण होतो. या ठिकाणी क्षणभर थांबल्यास भीतीदायक चित्र उभे राहते. पावसाळ्यात येथील चित्र वेगळे असते. कोसळणाऱ्या पावसाच्या लोटासोबत भुसभुशीत मुरुममिश्रित माती कोसळताना दिसते. अशावेळी मोठा दगड व दरड कोसळून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यासाठी पहाड खोदून दोन वर्षांचा काळ उलटला. परंतु या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.वाकी येथे वर्षातून दोनवेळा उर्स उत्सवाचे आयोजन केले जाते. येथे विविध राज्यांसह देश-विदेशातून जवळपास पाच लाख भाविक दर्शनासाठी येतात. परिसरातील गावातील विद्यार्थी पाटणसावंगी येथे सायकलने शिकायला जातात. शेतकरी, मजूर व नोकरवर्गही ये-जा करण्यासाठी हाच मार्ग वापरतात. त्यामुळे रस्त्यावर नेहमी वर्दळ असते.या मार्गावरून जड वाहने अथवा क्रेन, मशीन, पोकलॅण्ड आदी वाहने गेल्यास दरडीच्या ठिकाणी कंपन तयार होते, शिवाय पहाडावरील दगडही हलतात. त्यामुळे दगड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनुचित घटना टाळण्याकरिता प्रशासनाने या ठिकाणी सिमेंटची संरक्षण भिंत अथवा लोखंडी रेलिंग लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.