शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहर बससेवा बंद होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:13 IST

मनपाची आर्थिक परिस्थिती अगोदरच बिघडलेली आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात तोट्यात चालत असलेल्या ‘आपली बस’ने मनपा प्रशासनाला अडचणीत टाकले आहे. जीएसटीसह बिल देयकाच्या मुद्यावर ग्रीन बस आॅपरेटर स्कॅनियाने पाच दिवसांपूर्वीच आपली सेवा बंद केली आहे. रेड (लाल) बसच्या तीन आॅपरेटरलाही मनपा नियमित देयके अदा करण्यास असमर्थ ठरत आहे. आॅपरेटरचे एकूण ४२ कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी केवळ ७.५० कोटी रुपयांचे देयकेच अदा करता आले आहे. अशा परिस्थितीत रेड बसची चाके कधी बंद पडतील हे सांगता येत नाही.

ठळक मुद्देग्रीन बस झाली बंद : मनपाची आर्थिक परिस्थिती हलाखीची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपाची आर्थिक परिस्थिती अगोदरच बिघडलेली आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात तोट्यात चालत असलेल्या ‘आपली बस’ने मनपा प्रशासनाला अडचणीत टाकले आहे. जीएसटीसह बिल देयकाच्या मुद्यावर ग्रीन बस आॅपरेटर स्कॅनियाने पाच दिवसांपूर्वीच आपली सेवा बंद केली आहे. रेड (लाल) बसच्या तीन आॅपरेटरलाही मनपा नियमित देयके अदा करण्यास असमर्थ ठरत आहे. आॅपरेटरचे एकूण ४२ कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी केवळ ७.५० कोटी रुपयांचे देयकेच अदा करता आले आहे. अशा परिस्थितीत रेड बसची चाके कधी बंद पडतील हे सांगता येत नाही.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या आठवड्यातच मनपा मुख्यालयात रविवारी बैठक घेऊन वाहतूक सेवेसह शहराशी संबंधित दोन डझन मुद्यांवर चर्चा केली. या बैठकीत ग्रीन बससेवा सुरू ठेवण्याबाबत स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीच्या प्रतिनिधींशी बोलणेही केले होते, परंतु ते तयार झाले नाहीत. ग्रीन बससेवा १३ आॅगस्टपासून शहरात बंद झाली आहे. संबंधित बैठकीत २३ आॅगस्टला नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्याची घोषणाही गडकरींनी केली होती. ती बैठक आता २२ आॅगस्ट रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शहरात तीन रेड बस आॅपरेटर आहेत. आॅपरेटरचे जुलै शेवटपर्यंतचे प्रत्येकी १४ कोटी रुपये थकीत आहेत. पैसे न मिळाल्यामुळे तिन्ही आॅपरेटरनी बससेवा एक दिवस बंदही ठेवली होती. त्यानंतर मनपा प्रशासनाने तातडीने आॅपरेटरला प्रत्येकी २.५० कोटी रुपये अदा केले होते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीत तिकिटांपासून होणार उत्पन्न आॅपरेटरलाच देण्याचे निर्देश दिले होते. परंतु मनपा प्रशासन ऐकायला तयार नाही. वित्त विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे वाटत आहे की, केंद्रीय मंत्र्यांचे आदेश त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचे नाहीत.बससेवेसह नागनदी प्रकल्पावरही होणार चर्चानवी दिल्ली येथे २२ आॅगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे बससेवा, नागनदी पुनरुत्थान प्रकल्प आणि शहरात सुरू असलेल्या एनएचआयच्या कामांचा आढावा घेतील. या बैठकीत ग्रीन बसवर प्रामुख्याने चर्चा होईल. यात जीएसटीसह ग्रीन बसची थकीत रक्कम अदा करणे, अ‍ॅस्क्रो अकाऊंट, सर्व सुविधायुक्त डेपो यावरही चर्चा होईल.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक