लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाकरिता शेतकऱ्यांना धोरणानुसार मदत देण्यासाठी आणखी आठ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव नागपूर जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाला पाठवण्यात आला आहे.ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक फटका कापूस, सोयाबीन पिकांना बसला. संत्र्याचेही मोठे नुकसान झाले. शासनाने नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. खरीप पिकांसाठी हेक्टरी ८ हजार तर फळपिकांना हेक्टरी १८ हजार रुपये दोन हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात ५४ हजार २०२ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले. यामुळे १ लाख १९ हजार ३५५ शेतकरी बाधित झाले. शासनाच्या निकषानुसार जिल्हा प्रशासनाने कोरडवाहूसाठी हेक्टरी ६ हजार ८०० व ओलित पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये प्रमाणे ४६ कोटी ८५ लाख रुपयाच्या निधीची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र शासनाने ओलित आणि कोरडवाहू असा प्रकारच रद्द करून सर्व प्रकारच्या शेतपिकांसाठी ८ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. कोरडवाहूचे क्षेत्र जास्त असल्याने निधीत वाढ झाली. त्यामुळे ८ कोटी रुपये अतिरिक्त देण्याच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठवला आहे.
नागपूर जिल्ह्यात ५४,२०२ हेक्टरमध्ये नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 10:29 IST
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक फटका कापूस, सोयाबीन पिकांना बसला. संत्र्याचेही मोठे नुकसान झाले.
नागपूर जिल्ह्यात ५४,२०२ हेक्टरमध्ये नुकसान
ठळक मुद्देशेतकऱ्यांना मदतीसाठी नव्याने आठ कोटींच्या मागणीचा प्रस्ताव