शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

दलित इसमाला पेट्रोल टाकून पेटविले

By admin | Updated: May 18, 2014 11:54 IST

गावातील काही जणांनी एका दलित इसमाला पेट्रोल टाकून जिवंत पेटविले. गोंदिया जिल्ह्यातील कवलेवाडा (ता. गोरेगाव) येथे शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.

गोंदिया जिल्ह्यातील थरारक घटना : सहा जणांचे निर्दयी कृत्य

गोंदिया : गावातील काही जणांनी एका दलित इसमाला पेट्रोल टाकून जिवंत पेटविले. गोंदिया जिल्ह्यातील कवलेवाडा (ता. गोरेगाव) येथे शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. संजय निवृत्तीनाथ खोब्रागडे (४६) असे पीडिताचे नाव असून, अत्यवस्थ अवस्थेत त्याच्यावर नागपुरातील मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या कवलेवाडा गावातील काही व्यक्तींसोबत खोब्रागडेचा जागेच्या कारणावरून वाद होता. ग्रामसभा व सरपंचाकडेही हे प्रकरण गेले होते. तिढा सुटण्याऐवजी वाढतच गेल्यामुळे खोब्रागडेसोबत ‘त्या‘ व्यक्तींचे भांडणही झाले होते. या पार्श्वभूमीवर, खोब्रागडे नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री आपल्या घराच्या आवारात झोपला. पहाटे २.३० च्या सुमारास त्याच्या किंकाळ्या ऐकून पत्नी जागी झाली. खोब्रागडेला आगीच्या ज्वाळांनी घेरल्याचे पाहून त्याच्या पत्नीने लगेच पाणी ओतून त्याला कसेबसे विझवले. दरम्यान, आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी जागी झाली. त्यांनी खोब्रागडेला उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती कळताच गंगाझरी पोलीस रुग्णालयात पोहचले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांसमोर गोंदियाचे नायब तहसीलदार व्ही.आर. फंड यांनी खोब्रागडेचे बयान घेतले. झोपेत असताना आरोपींनी पेट्रोल ओतले आणि काही कळायच्या आतच त्यांनी कापड गुंडाळलेली जळती काडी अंगावर फेकून पेटविल्याचे त्याने सांगितले. खोब्रागडेने संशयित म्हणून गावातील काही लोकांची नावे सांगितली. त्याच्या बयानात संशयित म्हणून रुषीपाल टेंभरे (४६), माधुरी टेंभरे, भाऊलाल हरिणखेडे (४७), श्रीप्रकाश रहांगडाले (५१), पुनाजी ठाकरे (५७) आणि हेमंत ठाकरे (२९) यांची नावे असल्याचे पोलीस सांगतात. त्याच्या पत्नीने आपण झोपेत असल्यामुळे आरोपींबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचे पोलिसांना सांगितले. या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणी भादंविच्या कलम ३०७, १४३, १४७, १४८ अन्वये गुन्हा दाखल करून माधुरी टेंभरे वगळता सर्वांना अटक केल्याचे सांगितले. या थरारक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली असून, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिºहे प्रकरणाचा तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)