शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  जनावरांच्या अंत्यसंस्कारासाठी लवकरच दहनघाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:03 IST

शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करता भांडेवाडी येथे जनावरांचा दहनघाट निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

ठळक मुद्देभांडेवाडी येथे उभारणार ३.५० कोटींचा प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करता भांडेवाडी येथे जनावरांचा दहनघाट निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे.जानेवारी २०१६ मध्ये जनावरांच्या दहन घाटाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. स्थायी समितीने याला मंजुरी दिली होती. महापालिका आयुक्तांनी याला हिरवी झेंडी दिल्यानंतर प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. २०१७ मध्ये राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली. प्रस्तावाचा सर्वदृष्टीने विचार करण्यात आला. तांत्रिक सल्लागाराच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्याचा महापालिकेचा विचार आहे. पुढील काही दिवसात याबाबतच्या निविदा काढल्या जाणार आहे. निविदा मंजुरीनंतर कं त्राटदाराला भांडेवाडी येथे दहनघाट निर्माण करण्याबाबतचे कार्यादेश देण्यात येतील.स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरात जनावरांचा अत्याधुनिक दहनघाट उभारण्याच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानातून यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. भांडेवाडी येथे १८०० चौरस मीटर क्षेत्रात हा प्रकल्प उभारला जाणार आहे. विजेवर चालणाºया इन्सिनिरेटर मशीनवर ३.५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. पर्यावरण पूरक दहन घाटाचे निर्माण झाल्यानंतर मृत जनावरांना भांडेवाडी येथे जमिनीत पुरले जाणार नाही. मशीनच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जातील.नागपूर शहरात दररोज ४० ते ४५ जनावरे मरतात. यात काही पाळीव जनावरांचाही समावेश आहे. मृत जनावरांना भांडेवाडी येथे आणून त्याला जमिनीत पुरले जात होते. पावसाळ्याच्या दिवसात जनावरे मरण पावल्यास गोपलकांना पावसात खड्डा खोदून त्यावर अंतिम संस्कार करावे लागत होते. परंतु आता ही समस्या मिटणार आहे.भांडेवाडी येथे जागा शिल्लक नाहीशहरात दररोज ४० ते ४५ जनावरे मरण पावतात.जनावरांच्या अंत्यसंस्कारासाठी भांडेवाडी येथे दररोज खड्डे खोदावे लागतात. त्यामुळे आता येथे जागा शिल्लक राहिलेली नाही. पावसाळयाच्या दिवसात जनावरांवर अंतिम संस्कार करताना खड्डा खोदण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. तसेच आता येथे जागा शिल्लक राहिलेली नाही. भविष्याचा विचार करता जनावरांचा दहनघाट होणे ही काळाची गरज आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका