शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दादासाहेब कुंभारे यांचे आंबेडकरी चळवळीमध्ये महत्वपूर्ण योगदान - भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई

By आनंद डेकाटे | Updated: March 23, 2024 19:29 IST

Nagpur News: कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी बिडी कामगारांकरिता संसदेत बिडी कायदा पारित करून घेतला. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज उभारण्याकरिता पुढाकार घेतला, रिपब्लिकन पक्षाची बांधणी केली.

- आनंद डेकाटेनागपूर - कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी बिडी कामगारांकरिता संसदेत बिडी कायदा पारित करून घेतला. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज उभारण्याकरिता पुढाकार घेतला, रिपब्लिकन पक्षाची बांधणी केली. बौध्दांना अनुसुचित जाती मध्ये समाविष्ट करण्याकरिता १४ दिवसाचे आमरण उपोषण केले, अशा पध्दतीने कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी आंबेडकरी चळवळीला पुढे नेण्याकरिता महत्वपूर्ण याेगदान दिले, असे प्रतिपादन भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले.

कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील दादासाहेब कुंभारे परिसरात कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी समारोप समारंभ पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री एड. सुलेखा कुंभारे होत्या. यादरम्यान शांतिमार्च काढण्यात आला. ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब कुंभारे यांनवा अभिवादन करण्यात आले.

यावेळी बौध्द धम्माच्या प्रचार आणि प्रसार करिता संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व दादासाहेब कुंभारे यांच्या निकटवर्तीय असलेले भदंत आर्य नागाजुर्न सुरई ससाई यांना यांचा चिवरदान, मानपत्र व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक पुरण मेश्राम, साहित्यीक इ.मो. नारनवरे, विनायक जामगडे, राष्ट्रपाल मेश्राम, भदंत नागदिपंकर थेरो, भदंत डॉ. चिंचाल मेत्तानंद, भदंत प्रज्ञाज्योती, ज्योतीबोधी उपस्थित होते. संचालन राहुल बागडे यांनी केले तर देवेंद्र जगताप यांनी आभार मानले.

टॅग्स :nagpurनागपूर