स्मृती दिन : भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाईनागपूर : बिडी कामगारांचे नेते कर्मवीर दादासाहेब कुंभारे हे आंबेडकरी चळवळीतील एक समर्पित नेते होते, असे प्रतिपादन भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी केले. ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष बुद्ध वंदनेच्या कार्यक्रमानंतर उपस्थित अनुयायांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तत्पूर्वी हरदास शैक्षणिक संस्था, कर्मवीर दादासाहेब कुंभारे बिडी उत्पादक मजदूर सहकारी संस्था व ओगावा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कन्हान येथील हरदास घाटस्थित कुंभारे यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर ड्रॅगन पॅलेस येथे बुद्धवंदना घेण्यात आली. याप्रसंगी देवानंद डांगे, अजय कदम, तिलक गजभिये, संजय खोब्रागडे, मोरेश्वर पाटील, मुश्ताक अली, भीमराव फुसे, नंदा गोडघाटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दादासाहेब कुंभारे आंबेडकरी चळवळीतील समर्पित नेते
By admin | Updated: October 15, 2015 03:24 IST