शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या अंबाझरीतील कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयावर दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:01 IST

कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयातील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून बंधक बनविल्यानंतर कार्यालयात तोडफोड करून ६ दरोडेखोरांनी ४ लाख, ७३ हजारांची रोकड लुटून नेली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पहाटे ३.१५ ते ४ च्या सुमारास हा दरोडा पडला. आज सकाळी तो उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देसुरक्षा रक्षकाच्या गळ्याला चाकू लावला : तोंड बंद करून खोलीत डांबले : पावणेपाच लाख लुटून नेले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयातील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून बंधक बनविल्यानंतर कार्यालयात तोडफोड करून ६ दरोडेखोरांनी ४ लाख, ७३ हजारांची रोकड लुटून नेली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पहाटे ३.१५ ते ४ च्या सुमारास हा दरोडा पडला. आज सकाळी तो उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.जुने वर्मा ले-आऊटमध्ये ए. एस. अय्यर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. चे कार्यालय आहे. कार्यालयात २४ तास वेगवेगळे सुरक्षा रक्षक तैनात असतात. शुक्रवारी रात्री कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर कंपनीचे भागीदार आणि त्यांचे सहकारी कर्मचारी कार्यालय बंद करून आपापल्या घरी गेले. रात्रीच्या वेळी अशोक दीपानी नामक सुरक्षा रक्षक कर्तव्यावर होते. पहाटे ३.१५ च्या सुमारास दोन दरोडेखोर आले. त्यांनी दीपानीच्या गळ्यावर धारदार चाकू ठेवला आणि त्यांच्याकडून कार्यालयाच्या चाव्या हिसकावून त्यांना पहिल्या माळ्यावर नेले. या दोघांच्या पाठोपाठ पुन्हा चार दरोडेखोर आले. त्यांनी दीपानीच्या तोंडावर चिकट पट्टी चिकटवली. दीपानींना धमकी देऊन एका खोलीत डांबल्यानंतर कार्यालयातील विविध कक्षांच्या कपाटाची तोडफोड केली. त्यात ठेवलेली एकूण ४ लाख, ७३ हजारांची रोकड लुटून नेली. दरोडेखोर पळून गेल्यानंतर दीपानींनी स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर अय्यर यांना फोन करून दरोड्याची माहिती दिली. अय्यर हे चेन्नईला निघाले असल्यामुळे त्यांनी त्यांचे भागीदार संजय दिगांबर तांबे (वय ५५, रा. खामला) यांना सांगितले. तांबे यांनी कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतर अंबाझरी पोलिसांना कळविले. ठाणेदार भीमराव खंदाळे यांनी लगेच पोलीस उपनिरीक्षक एस. पी. अंबुरे तसेच आपल्या ताफ्यासह वर्मा ले-आऊटमध्ये धाव घेतली. माहिती कळताच सहायक आयुक्त राजेंद्र बोरावके, परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. माहिती घेतल्यानंतर आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं कामी लावले.श्वान घुटमळले, परत फिरले !शहरातील मध्यवर्ती भागात दरोडा पडल्यामुळे पोलिसांनी ठसेतज्ज्ञ तसेच श्वानपथक घटनास्थळी बोलवून घेतले. श्वानाने काही अंतरापर्यंतच दरोडेखोरांचा मार्ग दाखवला. त्यानंतर ते तेथेच घुटमळले आणि परत फिरले. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता दोन मोटरसायकलवर चार दरोडखोर एका मार्गाने आले तर दोन दरोडेखोर दुसऱ्या मार्गाने आले आणि त्यांनी हा दरोडा घातल्याचे दिसून आले. एकूणच घटनाक्रम बघता या कार्यालयाची दरोडेखोरांना माहिती असावी, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाRobberyदरोडा