शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर परवडेना, घरोघरी मातीच्या चुली; वस्त्यावस्त्यांमध्ये वाढले लाकडाचे टाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 07:10 IST

Nagpur News महिन्याला १० ते २० हजार रुपये कमावणाऱ्या वर्गाला सिलिंडर घेणे डोईजड झाले आहे. त्यामुळे पुन्हा घरोघरी मातीच्या चुली पेटू लागल्या आहेत. परिणामी लाकडाचे टाल वस्त्यांवस्त्यामध्ये वाढले आहेत.

ठळक मुद्देइंधनाच्या दरवाढीने गरिबांचे जगणे कठीण

मंगेश व्यवहारे

नागपूर : केंद्र सरकारने चूलमुक्त भारत करण्यासाठी उज्ज्वलासारख्या योजना राबविल्या. लोकांना घरगुती वापरासाठी इंधन म्हणून गॅस सिलिंडरच्या सवयी लावल्या; पण आजच्या घडीला सिलिंडरची किंमत हजार रुपये झाली आहे. महिन्याला १० ते २० हजार रुपये कमावणाऱ्या वर्गाला सिलिंडर घेणे डोईजड झाले आहे. त्यामुळे पुन्हा घरोघरी मातीच्या चुली पेटू लागल्या आहेत. परिणामी लाकडाचे टाल वस्त्यांवस्त्यामध्ये वाढले आहेत.

शहरामध्ये उज्ज्वला योजनेचेच ८० हजारांच्या जवळपास कनेक्शन आहेत, तर घरगुती गॅस कनेक्शन किमान ५ लाखांच्या वर आहे. आज प्रत्येक घरात गॅस कनेक्शन आहे; पण गॅसची किंमत वाढल्याने इंधन म्हणून आता लोकांनी जळाऊ लाकडाचा पर्याय शोधला आहे. उत्तर नागपुरातील लीलाबाई चावके यांचे ६ जणांचे कुटुंब आहे. घरातील मिळकत १८ हजार रुपये आहे. हिवाळ्याच्या दिवसात गरम पाणी व स्वयंपाक गॅसवर केल्यास १८ ते २० दिवसांत सिलिंडर संपते. इंधन म्हणून सिलिंडर वापरल्यास महिन्याला २००० रुपयांचा गॅस लागतो. ३०० रुपयांच्या लाकडात महिनाभर पाणी गरम व एक वेळेचा स्वयंपाकही होतो. किंमत कमी होती, त्यामुळे सिलिंडर परवडत होते. आता एकवेळेच्या स्वयंपाकासाठी सिलिंडर वापरतो. ही परिस्थिती प्रत्येक सामान्यांची आहे.

लाकडाच्या टालची संख्या वाढली

२० ते २५ वर्षांपूर्वी सिलिंडरचा वापर कमी असल्याने वस्त्यावस्त्यांमध्ये लाकडाचे टाल होते. अशीच परिस्थिती सध्या शहरामधील वस्त्यांवस्त्यामध्ये दिसून येत आहे. लोकांनी बंद केलेले टाल परत सुरू केले आहेत. लोकांना वस्तीमध्ये स्वस्त इंधन मिळत असल्याने किलोमागे रुपया-दोन रुपये आम्हालाही मिळत असल्याचे टालवाले साहू यांनी सांगितले.

- टिंबर मार्केटमधून ८० टक्के वेस्टेज सामान्य जण नेतात

टिंबर मार्केटमध्ये लाकडांची कटाई केल्यानंतर २५ टक्के वेस्टेज निघते. पूर्वी हे वेस्टज बाहेरगावाहून आलेल्या लेबरचे अन्न शिजविण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर घेऊन जात होते; पण आता वेस्टेज लाकूड घेऊन जाणारे ८० टक्के लोक हे सामान्य आहेत. घाटरोडच्या टिंबर मार्केटमध्ये लाकडाचे जे वेस्टेज निघते ते शिल्लकच राहतच नाही. ५ ते ६ रुपये किलोने सहज घेऊन जातात.

रसिकभाई पटेल, टिंबर व्यवसायी

- सबसिडी नावालाच

हजार रुपये गॅस झाला आज. सबसिडी बघितली तर ४० रुपये. पूर्वी घरगुती गॅसवर ३०० रुपयांपर्यंत सबसिडी मिळायची. सरकार गॅस सिलिंडरची सबसिडी बंद करण्याच्या मार्गावर आहे. सर्वच प्रकारच्या इंधनाच्या किमती वाढल्याने सामान्यांचे जगणे अवघड झाले आहे.

मंगेश कामोने, सामाजिक कार्यकर्ते

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर