शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

आॅरेंज सिटीतील अमित समर्थ यांचा सायकलिंगचा रेकॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 10:46 IST

आॅरेंज सिटीतील आघाडीचे सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी इतिहास घडवताना जगातील सर्वांत आव्हानात्मक रेसपैकी एक असलेली रशियातील रेड बुल्स ट्रान्स-सायबेरियन एक्स्ट्रीम (९१०० किलोमीटर) शुक्रवारी पूर्ण करण्याचा पराक्रम केला.

ठळक मुद्दे९१०० किलोमीटर अंतराची खडतर ट्रान्स-सायबेरियन एक्स्ट्रीम रेस पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅरेंज सिटीतील आघाडीचे सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी इतिहास घडवताना जगातील सर्वांत आव्हानात्मक रेसपैकी एक असलेली रशियातील रेड बुल्स ट्रान्स-सायबेरियन एक्स्ट्रीम (९१०० किलोमीटर) शुक्रवारी पूर्ण करण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारे डॉ. समर्थ हे भारतातील पहिले सायकलपटू ठरले.मॉस्को येथे २४ जुलै रोजी फ्लॅग आॅफ झालेल्या या रेसचे २५ दिवसात १५ टप्पे पूर्ण करायचे आव्हान होते. अखेर चारच सायकलपटूंनी शुक्रवारी व्लादिवस्तक ‘फिनिशिंग पॉर्इंट’ गाठला. पीटर बिश्चॉपने ३१५ तास ४५ मिनिट २८ सेकंद वेळेसह शर्यत पूर्ण करीत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर मायकल कनूडसेन (३३३.१३.०४), मार्सिलो फ्लोनटिनो सोरेस (३४६.१९.००) आणि अमित समर्थ (३४७.१६.१७) यांचा क्रमांक येतो. डॉ. समर्थ यांनी निर्धारित वेळेत नियोजित टप्पा गाठल्यानंतर रेड बुल्स संघाने जल्लोष करण्यास प्रारंभ केला.यापूर्वी, गेल्या वर्षी रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका (आरएएएम) ११ दिवस २१ तास आणि ११ मिनिट वेळेत पूर्ण केल्यापासून डॉ. अमित समर्थ चर्चेत आले होते. पाच हजार किलोमीटर अंतराची ही शर्यत समुद्र किनाऱ्यावरुन कॅलिफोर्निया ते अ‍ॅनापोलिश, मॅरीलँड या मार्गावर झाली होती. ही शर्यत पूर्ण करणारे डॉ. समर्थ पहिले भारतीय ठरले. तेवढ्यावर न थांबता त्यांनी रशियातील खडतर शर्यत पूर्ण करण्याचा चंग बांधला होता. अखेर अथक परिश्रम घेत त्यांनी आज खडतर रेस पूर्ण केली. अमित यांनी बुधवारी ६९० किलोमीटर अंतराचा १४ वा टप्पा पूर्ण केला होता. १५ वा म्हणजेच ७०० किमी अंतराचा निर्णायक टप्पा शुक्रवारी गाठत त्यांनी ऐतिहासिक पराक्रम केला.

डॉ. समर्थ यांची कामगिरी

  • रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका (पाच हजार किलोमीटर अंतर) ३६ वर्षांच्या इतिहासात पहिल्या प्रयत्नात पूर्ण करण्याचा पराक्रम.
  • आयर्न मॅन आणि रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका पूर्ण करणारे एकमेव भारतीय
  • इन्स्पायर इंडियातर्फे आयोजित डेक्कन क्लिफहँगर २०१७ (पुणे ते गोवा ६४३ किलोमीटर अंतर) रेस २५ तास २८ मिनिट वेळेत पूर्ण करीत जेतेपदाला गवसणी
  • बुसेलटोन (आॅस्ट्रेलिया) येथे ४ डिसेंबर २०१६ रोजी ११ तास ५४ मिनिट वेळेत (३.८ किलोमीटर जलतरण, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर धावणे) रेस पूर्ण करीत पूर्ण आयर्नमॅनचा किताब.
  • ११ वेळा आयर्नमॅन ७०.३ रेस फिनिश करण्याची कामगिरी. ३० ते ३९ वयोगटात ७०.३ आयर्नमॅन विभागात अव्वल मानांकित अ‍ॅथ्लिट.

पुन्हा सहभागी होण्यास उत्सुक : अमितरेसबाबतचा अनुभव सांगताना डॉ. समर्थ म्हणाले,‘ही खडतर रेस आहे. पहिले १० टप्पे ५ हजार किलोमीटर अंतराचे आणि त्यानंतरचे पाच टप्पे ४ हजार किलोमीटरचे होते. १० टप्प्यानंतर ही रेस आणखी खडतर झाली. किंग्स स्टेजनंतर मी थकलो होतो, पण आत्मविश्वास कायम होता.’ वातावरण आणि मार्गाबाबत बोलताना समर्थ म्हणाले,‘मार्ग खडतर होता. तिथे सर्व प्रकारच्या टेकड्या होत्या आणि मार्ग चढउताराचा होता. या व्यतिरिक्त रेसदरम्यान आव्हानात्मक वातावरणाला सामोरे जावे लागले. त्यात पाऊस, थंडी, धुके आणि अनेक ठिकाणी सकाळी व सायंकाळी शून्य डिग्री तापमानामध्ये मार्गक्रमण करावे लागले.’ आरएएएमच्या तुलनेत ही शर्यत खडतर असल्याचे सांगताना समर्थ म्हणाले,‘९ हजार किलोमीटरचा टप्पा खडतर होता. आरएएएम रेसच्या तुलनेत हा टप्पा आव्हानात्मक होता. पूर्ण २५ दिवस तुम्हाला मार्गावर प्रवास करावा लागतो. पहिल्या १० टप्प्यानंतर रेस अधिक आव्हानात्मक होते.’ समर्थ पुढे म्हणाले,‘आव्हानात्मक वातावरणात मी जवळजवळ सायकलने १० माऊंट एव्हरेस्ट शिखरे चढण्याची कामगिरी केली. भविष्यात माझ्याकडून पुन्हा ही रेस पूर्ण होईल किंवा नाही, याची कल्पना नाही. कदाचित दोन-तीन वर्षांनंतर मी पुन्हा ही रेस पूर्ण करण्याचा प्रयत्न करील.

टॅग्स :Sportsक्रीडा