शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

सायबर गुन्हेगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:49 IST

सायबर गुन्हेगारांचा सर्वत्र हैदोस नोकरी, लॉटरीचा फंडा जुना - रोजचा नवा डाव टाकून रक्कम उकळताहेत नरेश डोंगरे लोकमत ...

सायबर गुन्हेगारांचा सर्वत्र हैदोस

नोकरी, लॉटरीचा फंडा जुना - रोजचा नवा डाव टाकून रक्कम उकळताहेत

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सायबर गुन्हेगारांचा सध्या सर्वत्र हैदोस सुरू आहे. सायबर गुन्हेगारांनी फसविल्याचे वेगवेगळे प्रकार दरदिवशी उजेडात येत आहेत. प्रारंभी सायबर गुन्हेगार मोठमोठ्या संस्था, बँकांची साइट हॅक करायचे. आता मात्र सर्वत्र वळवळणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी मिळेल त्याला गंडविणे सुरू केले आहे. एकट्या नागपुरात वर्षभरात सायबर गुन्हेगारीच्या ४२३४ तक्रारी आल्या, त्यावरून सायबर गुन्हेगार किती बोकाळले, त्याचा प्रत्यय यावा.

प्रारंभी सायबर गुन्हेगार लॉटरी लागल्याची थाप मारून सर्वसामान्यांना आपल्या जाळ्यात ओढत होते. लॉटरीचे लाखो रुपये घेण्यासाठी प्रारंभी अगदीच किरकोळ रक्कम विशिष्ट शुल्क म्हणून ते आपल्या बँक खात्यात जमा करायला लावत होते. नंतर वेगवेगळी सबब सांगून रक्कम जमा करायला लावून ते पीडितांना गंडा घालायचे. लॉटरीला बळी पडणाऱ्या प्रकरणाचा बोभाटा झाल्याने सावज जाळ्यात येत नसल्याचे पाहून त्यांनी तीन वर्षांपूर्वी केबीसी (कौन बनेंगा करोडपती)चा बंपर पुरस्कार लागल्याची थाप मारून रक्कम उकळणे सुरू केले. त्यानंतर आधारकार्ड केवायसी अपडेट, झटपट कर्जाचे आमिष दाखवून, बँकेचे एटीएम, क्रेडिट कार्ड ब्लॉक होण्याची थाप मारून सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्यांची रक्कम गिळंकृत करण्याचे प्रकार सुरू केले. भीती दाखवून किंवा थाप मारून सायबर गुन्हेगार आपल्या मोबाइलवर एखादी लिंक पाठवितात. ती क्लिक करताच आपल्या बँक खात्याचा संपूर्ण तपशील त्याला कळतो. कारण आपला मोबाइल बँक खात्याशी अटॅच्ड असतो. त्यामुळे तो परस्पर आपल्या बँक खात्यातून आपली रक्कम त्याच्या अथवा साथीदाराच्या खात्यात वळती करून घेतो.

---

पोलीस अधिकाऱ्यासह निवृत्त न्यायाधीशांचीही रक्कम वळती

सायबर गुन्हेगारांनी अशा प्रकारे एका बँकेची साइट हॅक करून रक्कम वळती करण्याचा प्रयत्न केला होता. दुसरे म्हणजे, सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर वकील, डॉक्टर, प्राध्यापक, व्यावसायिक आणि एका पोलीस अधिकाऱ्यासह निवृत्त न्यायाधीशांचीही लाखोंची रक्कम आपल्या खात्यात वळती करून घेतली, हे विशेष.

-----

((भाग - २))

सायबर गुन्हेगारी

सावधान...! बँक खात्यासह तुमच्या प्रोफाईलवरही आहे नजर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सायबर गुन्हेगारांची तीक्ष्ण नजर तुमच्या बँक खात्यावरच नव्हे तर तुमच्या प्रोफाईलवरही आहे. त्यामुळे तुम्हाला ऑनलाइन नोकरी, उद्योग-व्यवसायाच्या भागीदारी, फ्रेन्चाईजीची ऑफर देणाऱ्यापासून सावधान. अन्यथा सायबर गुन्हेगारांकडून मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

अनेक उच्चशिक्षित तरुण नोकरी मिळवण्यासाठी अथवा व्यावसायिक मंडळी आपल्या उद्योग व्यवसायाच्या विस्तारासाठी शैक्षणिक अहर्तेसह संपूर्ण माहिती नोकरी डॉट कॉम अथवा अशाच दुसऱ्या कोणत्या पोर्टलवर अपलोड करतात. सायबर गुन्हेगार उच्चपदाची अन् लठ्ठ पगाराचे आमिष दाखवून संबंधित तरुण-तरुणीशी संपर्क साधतात. काहींनी देशात तर काहींना विदेशात नोकरीचे आमिष दाखवतात अन् व्हिसा, पासपोर्ट तसेच अन्य काही कारणे सांगून त्यांच्याकडून रक्कम उकळतात.

उद्योग-व्यावसायिकांना व्यवसायवृद्धीसाठी भागीदारी अथवा फ्रेन्चाईजी ऑफर करतात. आपला विश्वास बसावा म्हणून संबंधित कंपनीची बनावट वेबसाइटही गुगलवर अपलोड करतात. व्यवसायासाठी कधी मध्यस्थीची गळ घालतात. लाखोंचा लाभ देण्याचे आमिष दाखवून संबंधित व्यक्तीकडून बेमालूमपणे लाखोंची रक्कम उकळतात. कोतवाली परिसरातील एका कंपनी सेक्रेटरीला गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे तेलाच्या व्यवसायात लाखोंच्या लाभाचे आमिष दाखवून ६ लाखांचा गंडा घालण्यात आला.

----

खरेदी-विक्रीवरही नजर

सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदी-विक्री करणाऱ्या पोर्टलवरही नजर ठेवून असतात. कधी कार तर कधी दुचाकीचे फोटो ओएलएक्ससारख्या पोर्टलवर अपलोड करून खाली आपला संपर्क नंबर देतात. कमी रकमेत चांगले वाहन देण्याचे आमिष दाखवत हळूहळू ते नवीन वाहनाच्या किमतीपेक्षाही जास्त रक्कम उकळतात. प्रत्यक्षात वाहनाची डिलिव्हरी देतच नाहीत.

----

सैनिकांच्या नावाचा गैरवापर

ऑनलाइन फसवणूक करणारे भामटे अलीकडे सैनिकांच्या नावाने आपले बोगस ओळखपत्र तयार करतात. त्यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांनी वर्षभरात २०पेक्षा जास्त लोकांची वाहन खरेदी-विक्रीच्या नावाने फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्यांत सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि डॉक्टरचाही समावेश आहे. कोरोनाच्या काळात धान्य किट वाटायच्या आहेत, अशी थाप मारून सैनिकांच्या नावाचा गैरवापर करत सायबर गुन्हेगारांनी मोठ्या किराणा दुकानदारांना लाखोंचा गंडा घातल्याच्याही घटना घडल्या.

---

(((सायबर गुन्हेगारी - भाग ३))

फेसबुक फ्रेण्डशिप... जरा सांभाळून

विदेशी मित्र, नको रे बाबा - गिफ्टचे आमिष दाखवून लावतात चुना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार अनेक आहेत. त्यातील सर्वात जास्त फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या फेसबुकवरील मैत्रीतून घडल्याचे दिसतात. सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा हा अतिशय सोपा फंडा आहे.

विदेशात राहात असल्याचे भासवून सायबर गुन्हेगार फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून आधी फेसबुकवरून महिला-पुरुष सोबत मैत्री करतात. नंतर रोज सलग ऑनलाइन संपर्कात राहतात. या संपर्कातून संबंधित महिला, पुरुषाची आर्थिक स्थिती कशी आहे, याची ते बेमालूमपणे माहिती काढून घेतात. सलग संपर्कातून विश्वास संपादन केल्यानंतर मित्र, मैत्रिणीला सणासुदीचे औचित्य साधून गिफ्ट पाठवायचे असे सांगतात. ते गिफ्ट दिल्ली, मुंबईच्या विमानतळावर आल्याचा संबंधिताला फोन, मेसेज किंवा मेलही येतो. या गिफ्टची किंमत लाखो रुपये असल्याने तुम्हाला कस्टम ड्युटी भरावी लागेल, असे सांगितले जाते. विमानतळावरून कस्टम अधिकारी बोलतो, असे सांगणारे सर्व जण कथित फेसबुक फ्रेण्डचे साथीदारच असतात. त्यात पुरुषांसोबत महिलेचाही समावेश असतो. लाखोंच्या गिफ्टच्या आमिषात प्रारंभी काही हजार रुपये भरण्यास बाध्य करून सायबर गुन्हेगार नंतर वेगवेगळ्या नावाखाली रक्कम उकळतात. भरपूर रक्कम जमा करूनही गिफ्ट मिळतच नाही. उलट वेगवेगळे कारण सांगून रक्कम जमा करण्याचा तगादा लावला जातो. रक्कम भरण्यास नकार दिल्यानंतर आरोपी आपले मोबाइल, मेल, मेसेज सर्वच डिलीट करून पीडित व्यक्तीसोबतचा संपर्क तोडून टाकतात.

याच पठडीतला दुसरा प्रकार आहे अरबो रुपयांची संपत्ती घेऊन विदेशातून भारतात (तुम्ही ज्या शहरात आहात, त्या शहरात) राहायला येण्याच्या थापेबाजीचा. अरबो, खरबो रुपयांची संपत्ती आहे. मात्र, कुणीही नातेवाईक नाही. एकलकोंडेपणा खायला धावतो. त्यामुळे ही सर्व संपत्ती विकून अरबो रुपये (डॉलर) घेऊन तुमच्याकडे येतो. यातून छान समाजसेवा करून शांतीपूर्ण जीवन जगायचे आहे, अशी थाप मारून विदेशी फेसबुक फ्रेण्ड भारतात यायला निघाल्याचा मेसेज देतो. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तो फोन करून दिल्ली-मुंबईच्या एअरपोर्टवर कस्टमवाल्यांनी अडवल्याचे सांगतो. एवढे विदेशी चलन घेऊन जायचे असेल तर त्यासाठी काही लाख रुपये विशिष्ट ड्युटी जमा करावी लागेल, असे सांगितले जाते. त्यानंतर एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या किंवा कस्टम अधिकाऱ्याच्या नावाखाली ती रक्कम जमा करण्यास भाग पाडले जाते अन् नंतर ते भामटे संपर्क तोडून टाकतात.

---

फेक फेसबुक प्रोफाईल

सायबर गुन्हेगार तुमच्या कुणाचीही फेक फेसबुक प्रोफाईल तयार करतात. तुमचा फोटो आणि नाव वापरून तुमच्या फ्रेण्डलिस्टमध्ये ते कॉमन मेसेज पाठवितात. अल्पावधीसाठी मोठ्या रकमेची अत्यंत आवश्यकता आहे. कुणाला काही बोलू, सांगू शकत नाही, अशी सबब सांगून ते अकाउंट नंबर देतात अन् आपले उखळ पांढरे करून घेतात. जवळचा मित्र आर्थिक अडचणीत असल्याचे मानून कोणतीही शहानिशा न करता काही जण त्या बँक खात्यात रक्कम जमा करतात. शहरातील एका सुप्रसिद्ध डॉक्टर, एका ज्येष्ठ पत्रकाराचे तसेच व्यावसायिकाचे फेक फेसबुक अकाउंट तयार करून सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मित्राकडून रक्कम उकळली आहे. निर्ढावलेल्या सायबर गुन्हेगारांनी गेल्या आठवड्यात नागपूरच्या पोलीस आयुक्तांच्या फेसबुक अकाउंटसोबत छेडछाड करून काहींना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली होती, हे विशेष.

----

((भाग -४))

सायबर गुन्हेगारीचा खतरनाक पैलू

महिलांसाठी घातक - आर्थिक अन् शारीरिक शोषण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऑनलाइन गुन्हेगारीचा एक प्रकार अत्यंत खतरनाक आहे. तो मेट्रोमॉनियल साइटवरून घडतो. यातून केवळ आर्थिकच नव्हे तर महिलांचे मानसिक तसेच शारीरिक शोषण झाल्याचेही अनेकदा उजेडात आले आहे. आर्थिक आणि शारीरिक फसवणुकीचा उद्देश ठेवूनच सायबर गुन्हेगार असे गुन्हे करतात.

लग्न संबंध जुळविण्याच्या संकेतस्थळावर ते भामटे आपली आकर्षक प्रोफाईल आणि फोटो अपलोड करतात. चांगली नोकरी, उद्योगधंदा असल्याचे भासवून कुटुंबीयांत कुणी नाही, असे सांगितले जाते. साइटवरच्या आर्थिकदृष्ट्या सधन आणि सुस्वरूप तसेच एकट्या पडलेल्या महिलेला हेरून नंतर हे सायबर भामटे तिच्याशी ऑनलाइन सलगी वाढवतात. नंतर लग्नाचे आमिष दाखवून भेटण्याच्या, घर पाहण्याच्या बहाण्याने ते महिलेच्या घरी पोहोचतात. मुक्काम करतात किंवा फिरायच्या बहाण्याने तिला दुसरीकडे घेऊन जातात. तेथे तिच्याशी शरीरसंबंध जोडतात. त्याचे मोबाइलमध्ये शूटिंगही करतात.

संधी मिळताच रोख तसेच दागिने घेऊन पळ काढतात. काही भामटे आकस्मिक अडचण आल्याची थाप मारून महिला किंवा तिच्या नातेवाइकांकडून रक्कम उकळतात अन् गायब होतात. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या प्रोफाईल तपासल्यावर त्यातील बरीचशी माहिती फेक असल्याचे उघड होते. प्रतापनगरातील एका सधन कुटुंबातील महिलेची झालेली फसवणूक तिच्यावर कमालीचा मानसिक आघात करणारी ठरली होती. बऱ्याच दिवसांच्या उपचारांनंतर अलीकडे ही महिला सामान्य झाली आहे.

-----

ब्लॅकमेलिंगही केली जाते

अशा प्रकारे फसवणूक करणारे भामटे संबंधित महिला आणि तिच्या नातेवाइकांना ब्लॅकमेल करतात. महिलेसोबतच्या संबंधांचे व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीही उकळतात.

----