शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात सायबर टोळीचा हैदोस सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 20:39 IST

कधी बँकेतून तर कधी वेगवेगळ्या जॉब प्लेसमेंट कंपनीतून बोलतो, असे सांगून नागरिकांना फसविण्याचे प्र्रकार सुरूच आहे. ही फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीविरुद्ध पोलीस केवळ गुन्हे दाखल करून मोकळे होत आहे. त्यांच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश येत नसल्यामुळे सर्वसामान्यांची फसवणूक बिनबोभाट सुरू आहे. गणेशपेठमध्ये गुरुवारी अशाच प्रकारचा पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्यांची बिनबोभाट फसवणूक : अनेकांना लाखोंचा गंडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कधी बँकेतून तर कधी वेगवेगळ्या जॉब प्लेसमेंट कंपनीतून बोलतो, असे सांगून नागरिकांना फसविण्याचे प्र्रकार सुरूच आहे. ही फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीविरुद्ध पोलीस केवळ गुन्हे दाखल करून मोकळे होत आहे. त्यांच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश येत नसल्यामुळे सर्वसामान्यांची फसवणूक बिनबोभाट सुरू आहे. गणेशपेठमध्ये गुरुवारी अशाच प्रकारचा पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे.एअर इंडियामध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाचे सायबर टोळीतील भामट्याने ९४ हजार रुपये लंपास केले. शिवाजीनगर, हनुमान चौकात राहणारा राकेश अशोकराव डायरे (वय २६) हा तरुण मासे विक्रीचा व्यवसाय करतो. आॅक्टोबर २०१७ मध्ये त्याला ९७७३५५४१९४, ८७५०१८७२२१ आणि ९७७३५५४१५९ या मोबाईल नंबरवरून वेगवेगळे फोन आले. पलिकडून बोलणाऱ्या आरोपीने राकेशला एअर इंडियात विमानतळावर सुरक्षा रक्षकाची नोकरी लावून देतो, अशी थाप मारली. त्यासाठी प्रारंभी १० हजार रुपये आरोपीने राकेशकडून त्याच्या बँक खात्यात (क्रमांक २०२५२५०२०८३) जमा करून घेतले. त्यानंतर वेगवेगळे कारण सांगून आरोपी राकेशला त्याच्या बँक खात्यात रक्कम जमा करायला लावत होता. अशा प्रकारे २१ नोव्हेंबर २०१७ पर्यंत ८४ हजार रुपये जमा करायला भाग पाडल्यानंतर राकेशने त्याच्या मागे नोकरीचा तगादा लावला. तो टाळाटाळ करीत असल्याचे पाहून राकेशने आपली रक्कम परत मागितली. त्यावर आरोपीने पुन्हा एक क्लृप्ती लढवली. तुला तुझी संपूर्ण रक्कम परत हवी असेल तर पुन्हा नमूद क्रमांकाच्या बँक खात्यात १० हजार रुपये जमा कर, असे म्हटले. ही रक्कम जमा केल्यानंतर आरोपीने राकेशसोबत संपर्क तोडला. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर राकेशने सहा महिन्यांपूर्वी गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्याला सायबर सेल मध्ये जाण्याचा सल्ला दिला. सायबर सेलकडून चौकशी झाल्यानंतर पुन्हा हे प्रकरण गणेशपेठ ठाण्यात पाठविण्यात आले. त्यानंतर गुरुवारी गणेशपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.दिल्ली, बिहार कनेक्शनराकेशला ज्या क्रमांकावरून हे फोन आले ते मोबाईल क्रमांक दिल्ली, नोएडा येथील इसमांच्या नावावर आहेत. सायबर टोळीतील गुन्हेगार दिल्ली, नोएडा, बिहार, झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. अस्खलित हिंदी, इंग्रजी बोलणारे हे गुन्हेगार स्वत:ला कधी बँकेचे अधिकारी तर कधी पोलीस अधिकारी असल्याचे सांगतात. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले, आऊटडेटेड झाले. नवीन कार्ड द्यायचे आहे, असे सांगून तो संपर्क करतात. बोलता बोलताच सहजपणे तुमच्या एटीएम कार्डचा नंबर, पीन कोड किंवा बँकेचा खातेक्रमांक आणि इतर माहिती वदवून घेतात. पुढच्या काही क्षणातच तुमच्या खात्यातून शक्य होईल तेवढी रक्कम हे भामटे आॅनलाईन ट्रान्सफर करतात. सकाळपासून सायंकाळपर्यंत हे लुटारू अशा प्रकारे रोज अनेकांना लाखोंचा गंडा घालतात.७०३३८२८३३५ क्रमांकापासून सावधान !या टोळीतीलच एक लुटारू स्वत:चे नाव राजा कुमार, बिहार असे सांगतो. तो स्वत:ला बँक अधिकारी असल्याचे सांगून एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याची थाप मारतो. तातडीने नवीन एटीएम कार्ड पाहिजे असेल तर स्वत:च्या बँक खात्याची आणि एटीएम कार्डची माहिती द्या, अन्यथा तुम्हाला पुन्हा एटीएम कार्ड मिळणार नाही, असा धाक दाखवतो. नागपुरात शुक्रवारी सकाळी मोबाईल क्रमांक ७०३३८२८३३५ वरून या भामट्याने काहींना फोन करून अशाच प्रकारे ठगविण्याचा प्रयत्न केला. या मोबाईलवरून येणाऱ्या फोनला कोणतीही माहिती देऊ नये.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी