शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांवर सायबर टोळीचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 11:02 IST

नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा पोलीस ठाण्यात एका आशा वर्करने तक्रार केली आहे. वैद्यकीय अधिकारी सांगून आशा वर्करकडून सरकारी योजनांची माहिती त्याने मागितली होती. ही बाब तिच्या लक्षात आल्यावर त्या आशा वर्करला सायबर गुन्हेगाराने अश्लील शिवीगाळ केली.

ठळक मुद्दे वैद्यकीय अधिकारी सांगून आशा वर्करकडून घेताहेत लाभार्थ्यांची माहितीजलालखेडा पोलिसात तक्रार दाखल

मंगेश व्यवहारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बँकेचे माहिती घेऊन खाते रिकामे करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळ्यांनी अनेकांना फसविले आहे. आता हे गुन्हेगार सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांचा लाभसुद्धा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा पोलीस ठाण्यात एका आशा वर्करने तक्रार केली आहे. वैद्यकीय अधिकारी सांगून आशा वर्करकडून सरकारी योजनांची माहिती त्याने मागितली होती. ही बाब तिच्या लक्षात आल्यावर त्या आशा वर्करला सायबर गुन्हेगाराने अश्लील शिवीगाळ केली.

७८०१९७५६२२ या क्रमांकावरून नागपूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या ७ ते ८ आशा वर्कर यांना कॉल आला. त्याने स्वत:ला आरोग्य विभागातील अधिकारी सांगून प्रधानमंत्री मातृवंदन योजना व जननी सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती मागितली. आशा वर्करने त्याच्यावर योजनेच्या लाभार्थ्यांची माहितीही दिली. ही माहिती आशा वर्करच्या वरिष्ठांपर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी संपूर्ण आशा वर्करच्या ग्रुपवर अनोळख्या व्यक्तीला माहिती देऊ नका, असे आवाहन केले. दरम्यान, जलालखेड्यातील एका आशा वर्करला त्याच क्रमांकावरून पुन्हा कॉल आला. मात्र तिने माहिती देण्यास नकार दिल्याने तिला अश्लील शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान, तिने जलालखेडा पोलिसात तक्रारही दाखल केली. या क्रमांकाला ट्रू कॉलरवर सर्च केले असता, राजकुमार असे लिहून आले. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना रोख स्वरूपात लाभ मिळतो. हा सायबर गुन्हेगार आशा वर्करच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर घेऊन, लाभार्थ्यांना थेट कॉल करून बँकेच्या खात्याची माहिती करून घेतो. शासनाकडून मिळालेला लाभ परस्पर उचलून घेत असल्याचा संशय आहे.- कुणीही माहिती देऊ नयेआशा वर्कर असो की लाभार्थी यांनी अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलला प्रतिसाद देऊ नये. लाभार्थ्यांची वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कुठल्यातरी राज्यातून कॉल करणाऱ्या हिंदी भाषिक व्यक्तीला आशा वर्करचे मोबाईल नंबर कसे मिळाले, यासंदर्भात आरोग्य विभाग वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम