शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सायबर गुन्हेगारांची जेवणाच्या थाळीवरही नजर; एका थाळीवर २ मोफत देण्याची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 09:43 IST

नवनवीन शक्कल लढवून अनेकांच्या बँक खात्यातून रक्कम लंपास करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता चक्क जेवणाच्या थाळीवरही हात मारला आहे. एका थाळीवर दोन जेवणाच्या थाळी मोफत देण्याची थाप मारून सायबर गुन्हेगाराने नागपुरातील दोन जणांचे १६ हजार रुपये लंपास केले.

ठळक मुद्देबँक खात्यातील रक्कम साफ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवनवीन शक्कल लढवून अनेकांच्या बँक खात्यातून रक्कम लंपास करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता चक्क जेवणाच्या थाळीवरही हात मारला आहे. एका थाळीवर दोन जेवणाच्या थाळी मोफत देण्याची थाप मारून सायबर गुन्हेगाराने नागपुरातील दोन जणांचे १६ हजार रुपये लंपास केले. या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. प्रतापनगर चौकाजवळ गायत्री भोजनालय आहे. सध्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट बंद आहेत. बहुतांश व्यवहार ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन फूड डिलिव्हरी देण्याची शक्कल लढवून त्यामाध्यमातून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढणे सुरू केले आहे.येथील गायत्री भोजनालयाचे बनावट फेसबुक पेज तयार करून त्यावर त्यांनी ऑनलाईन एक थाळी मागविल्यास दोन थाळी जेवण मोफत देऊ, असे लिहिले होते. त्यावर आपला मोबाईल क्रमांकही टाकला होता. त्या मोबाईल क्रमांकावर शालू श्रीवास्तव आणि अन्य एका व्यक्तीने संपर्क करून क्रमश: जेवणाची ऑर्डर दिली. ही ऑर्डर स्वीकारल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी या दोघांनाही मोबाईलवर एक लिंक पाठविली. ती डाऊनलोड करून दहा रुपये आमच्या बँक खात्यात जमा करा. उर्वरित पैसे घरी जेवणाची थाळी पोहोचल्यावर द्या, असे त्याने म्हटले होते. त्यानुसार दोघांनीही प्रत्येकी दहा रुपये सायबर गुन्हेगाराच्या खात्यात जमा केले. त्यानंतर काही वेळातच महिलेच्या खात्यातून चार तर पुरुषाच्या खात्यातून १२ हजार, असे एकूण १६ हजार रुपये गुन्हेगाराने ट्रान्सफर करून घेतले. आपल्या बँक खात्यातील रक्कम कमी झाल्याची बाब लक्षात येताच दोन्ही पीडितांनी सायबर सेलमध्ये तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.सावधगिरी बाळगण्याचे आवाहनया आणि अन्य ऑनलाइन गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानिक सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाईन व्यवहार करताना आपला ओटीपी नंबर कोणालाही देऊ नये, अनोळखी लिंकवर आपल्या बँक खात्याची माहिती देऊ नये, गुगल फार्मच्या माध्यमातून लिंक तयार केली असल्यास त्यांच्या खालील बाजूस 'रिपोर्टिंग' हा पर्याय असतो. तो निवडावा म्हणजे ती लिंक गुगलकडून डिलीट केली जाईल, असेही सुचविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नागपूर सायबर सेलच्या ०७१२-२५६६७६६ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन सायबर सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक जगताप यांनी केले आहे.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम