शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘क्युट’ सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 11:29 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना ‘चेक इन’ करण्यासाठी अनेकदा लांबलचक रांगांमध्ये उभे राहावे लागते. मात्र आता ‘सीता’ या ‘सॉफ्टवेअर’मुळे हा त्रास कमी होणार आहे.

ठळक मुद्दे‘सीता’मुळे २१ ‘चेक इन काऊंटर्स’ होणार रांगेत लागण्याचा प्रवाशांचा त्रास कमी होणार

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना ‘चेक इन’ करण्यासाठी अनेकदा लांबलचक रांगांमध्ये उभे राहावे लागते. मात्र आता ‘सीता’ या ‘सॉफ्टवेअर’मुळे हा त्रास कमी होणार आहे. विमातळावर प्रवाशांसाठी ‘क्युट’ सेवा (कॉमन युज टर्मिनल इक्विपमेंट) सुरू करण्यात आली आहे. या ‘सॉफ्टवेअर’मुळे विमानतळावर पाच आणखी नवीन ‘चेक इन काऊंटर्स’ सुरू करण्यात येणार आहेत.एक वर्षाअगोदर विमानतळावर एका ‘एअरलाईन्स’साठी एकच ‘चेक इन काऊंटर’ होते. ‘सीता’मुळे आता कुठल्याही ‘काऊंटर’चा उपयोग कोणतीही ‘एअरलाईन्स’ करू शकते. एखाद्या ‘एअरलाईन्स’च्या विमानाचे ‘टेक आॅफ’ झाल्यानंतर प्रणालीला ‘लॉग आॅफ’ करण्यात येते. यानंतर त्याच प्रणालीवर दुसऱ्या ‘एअरलाईन्स’कडून ‘लॉग इन’ करून ‘चेक इन’ची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेचीदेखील बचत होईल. सोबतच ‘बोर्डिंग पास’ मिळविण्यासाठी ‘सेल्फ सर्व्हिस’देखील सुरू करण्यात आली आहे. यासाठी ‘किओस्क’ बसविण्यात आले आहेत. ‘सीता’च्या मदतीने वेळ वाचविण्यासाठी जी सुविधा देण्यात येत आहे, त्यासाठी प्रति प्रवासी ५०० रुपयांपर्यंत शुल्क घेण्यात येत आहे. त्यामुळे विमानतळाच्या महसुलात दरवर्षी अडीच ते तीन कोटींची भर पडणार आहे. ‘क्युट’ शुल्काचा ४४.१४ टक्के वाटा ‘एमआयएल’ला (मिहान इंडिया लिमिटेड) मिळतो, तर उर्वरित रक्कम ‘एअरलाईन्स’ व ‘सॉफ्टवेअर कंपनी’ला जाते. दरम्यान, या सुविधेमुळे प्रवाशांचा नेमका किती वेळ वाचत आहे, याची माहिती ‘एमआयएल’कडे नाही. प्रवासी सेवेसाठी शुल्क देत आहेत. त्यामुळे नेमका किती वेळ वाचेल, यासंदर्भात ‘एमआयएल’ने सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे.

महिनाभरात स्थापन होणार ‘काऊंटर्स’विमानतळावर सद्यस्थितीत १६ ‘चेक इन काऊंटर्स’ आहेत. पुढील महिनाभरात ही संख्या २१ इतकी होणार आहे. ‘सेल्फ सर्व्हिस’च्या माध्यमातून ‘किओस्क’वर ‘बोर्डिंग पास’ घेण्याची सुविधा वाढविण्यात येत आहे. प्रवासी ‘किओस्क’वरच ‘पीएनआर’ क्रमांक टाकून ‘बोर्डिंग पास’चे ‘प्रिंट आऊट’ घेऊ शकतात, अशी माहिती ‘एमआयएल’चे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुलेकर यांनी दिली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर