शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शीर आणि हातपाय कापलेले पोतेही मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:19 IST

निर्दयपणे कापून पोत्यात भरलेले शरीराचे दुसरे अवयवही गांधीसागर तलावाच्या काठावर गुरुवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांना आढळले. शहारे आणणाऱ्या या हत्याकांडाने पोलीस दलही हादरले असून, हा तरुण कोण आणि त्याची एवढ्या निर्दयपणे कुणी हत्या केली, त्याचा पोलीस तपास करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, सीसीटीएनएसमधून नागपूर शहर आणि ग्रामीण भागासोबतच विदर्भातील ठिकठिकाणच्या जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे.

ठळक मुद्देसर्वत्र थरार, मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरूसीसीटीएनएसमधून काढला बेपत्ता तरुणांचा डाटाविदर्भातील सर्वच पोलीस ठाण्यांना माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निर्दयपणे कापून पोत्यात भरलेले शरीराचे दुसरे अवयवही गांधीसागर तलावाच्या काठावर गुरुवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांना आढळले. शहारे आणणाऱ्या या हत्याकांडाने पोलीस दलही हादरले असून, हा तरुण कोण आणि त्याची एवढ्या निर्दयपणे कुणी हत्या केली, त्याचा पोलीस तपास करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, सीसीटीएनएसमधून नागपूर शहर आणि ग्रामीण भागासोबतच विदर्भातील ठिकठिकाणच्या जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे.गांधीसागर तलावात बुधवारी रात्री पोत्यात बांधलेले धड मिळाले होते. शरीराचे अन्य अंग गायब असल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली होती. गणेशपेठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, एका पोत्यात धड आढळले त्यामुळे शीर आणि इतर अवयव त्याच भागात असावे, असा अंदाज बांधून पोलिसांनी शोधाशोध केली असता, गुरुवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांना दुसरे एक पोते आढळले. त्यात तरुणाचे शीर आणि इतर अवयव होते. डॉक्टरांच्या मदतीने पोलिसांनी ते सर्व अवयव जोडून त्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार, मृतक अंदाजे ३० वर्षांचा असावा, त्याचा वर्ण मध्यम गोरा, बारीक दाढी आणि मिशी काढलेली असल्याचे पोलीस सांगतात.दरम्यान, या थरारक हत्याकांडाने पोलिसही हादरले आहेत. प्रकरणाची माहिती कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन सीसीटीएनएसच्या माध्यमातून नागपूर-विदर्भातील अनेक ठिकाणच्या बेपत्ता तरुणांची माहिती पोलिसांनी आज संकलित केली. त्यांच्यातून नमूद वर्णनाचा तरुण कोण, त्याची पडताळणी पोलीस करीत आहेत. ज्या पोत्यात मृतदेहाचे तुकडे आढळले, त्या पोत्यावर आढळलेल्या काही मजकुरांवरून पोलिसांनी व्यापाऱ्यांकडे चौकशी चालविली आहे.अट्टल गुन्हेगारांचे कृत्यमृताची ओळख पटल्यानंतर आरोपींचा छडा लावणे सोपी होणार आहे. एवढ्या निर्दयपणे हत्या करून शरीराचे तुकडे करणे, ते वेगवेगळ्या पोत्यात भरणे आणि नंतर त्याची अशा पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणे, सामान्य गुन्हेगारासाठी शक्य नाही. आरोपी अनेक असावेत, ते सराईत गुन्हेगार असावे आणि अनैतिक प्रकरणाची या हत्येला जोड असावी, असा तर्क बांधून पोलिसांनी चौकशीचे चक्र फिरविले आहे. अनैतिक संबंधातून हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून एका पोत्यात भरून फेकल्याची घटना यापूर्वी सीताबर्डीत उघडकीस आली होती.

टॅग्स :MurderखूनGandhi Sagarगांधीसागर