कोळसा संकटावर सध्या ‘ब्रेक’; वीज केंद्रांमध्ये वाढला साठा; पुरवठ्यातही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 07:15 AM2021-11-13T07:15:00+5:302021-11-13T07:15:01+5:30

Nagpur News परळीसोडून इतर वीज केंद्रातील कोळसा साठा अजूनही संवेदनशील स्थितीत आहे. परंतु परिस्थिती सुधारत असल्याने वीज केंद्र लवकरच यातूनही बाहेर येईल, असा महाजेनकोचा दावा आहे.

Currently a ‘break’ on the coal crisis; Increased reserves in power stations; Increase in supply | कोळसा संकटावर सध्या ‘ब्रेक’; वीज केंद्रांमध्ये वाढला साठा; पुरवठ्यातही वाढ

कोळसा संकटावर सध्या ‘ब्रेक’; वीज केंद्रांमध्ये वाढला साठा; पुरवठ्यातही वाढ

Next

कमल शर्मा

नागपूर : मान्सून सुरू होताच राज्यातील औष्णिक वीज केंद्रासमोर उभे ठाकलेले कोळशाचे संकट सध्यातरी टळले आहे. परळीसोडून इतर वीज केंद्रातील कोळसा साठा अजूनही संवेदनशील स्थितीत आहे. परंतु परिस्थिती सुधारत असल्याने वीज केंद्र लवकरच यातूनही बाहेर येईल, असा महाजेनकोचा दावा आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, टळलेले संकट हे तात्पुरते आहे. पुढील मान्सूनमध्ये ही समस्या होऊ नये म्हणून महाजेनकोला आतापासूनच पाऊल उचलावे लागेल.

राज्यातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा साठा अतिशय कमी झाला होता. १२ पेक्षा अधिक वीज युनिटमधील उत्पादन थांबले होते. पॉवर एक्सचेंजमधून १५ रुपये प्रति युनिटच्या दराने वीज खरेदी करून पुरवठा करण्याची वेळ आली होती. परंतु सध्या राज्यातील परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे. अजूनही पाच युनिट बंद आहेत, मात्र ते कोळशामुळे नाहीत. महाजेनकोचे म्हणणे आहे की, कोळसा खाणीमध्ये पाणी जमा झाल्याने पुरवठा प्रभावित झाला होता. पाऊस थांबताच कोळशाचा पुरवठाही पुन्हा वाढला आहे. पुरवठा वाढल्याने खाणीतून सायडींगपर्यंत कोळसा आणण्याची जबाबदारी आरसीआर (रस्ते व रेल्वे) वाहतुकीच्या माध्यमातून महाजेनकोने स्वत: उचलली आहे. यामुळे खर्च वाढला मात्र कोळशाचा पुरवठा व्यवस्थित झाला. आता वीज केंद्रांमध्ये २ लाख ६० हजार मेट्रिक टनपेक्षा अधिकचा कोळसा साठा आहे. पूर्व तो २ लाख मेट्रिक टन इतका होता.

दर दहाव्या दिवशी २०० कोटी

कोळसा पुरवठ्यात सुधारणा व्हावी, यासाठी महाजेनको आता कोळशाची थकीत रक्कम अदा करण्यासही प्राधान्य देत आहे. २५०० कोटीची थकबाकी चुकविण्यासाठी कंपनी दर दहाव्या दिवशी वेकोलिसह इतर कोळसा कंपन्यांना २०० कोटी रुपयाचे देणे देत आहे.

वीज केंद्र - इतक्या दिवसाचा साठा

कोराडी (६६०) - १

कोराडी (२१०) -१.५

नाशिक - २

भुसावळ - १.५

परळी - ४.२५

पारस - ३

चंद्रपूर - १.२५

खापरखेडा - १.५

Web Title: Currently a ‘break’ on the coal crisis; Increased reserves in power stations; Increase in supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.