शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
2
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
3
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
4
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
5
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
6
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
7
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
8
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
9
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
10
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
11
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
12
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
13
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
14
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
15
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
16
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
17
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
18
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
19
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
20
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी

भरधाव धावणाऱ्या वाहनांना लगाम लावणार; नवनियुक्त प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2023 19:55 IST

Nagpur News भरधाव धावणाऱ्या वाहनांना लगाम लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलल्या जातील, अशी माहिती अमरावती आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांनी दिली. त्यांनी आज नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ कार्यालयाचा अतिरीक्त पदभार हाती घेतला.

नागपूर : प्रवासी बसेससह ट्रक, ट्रेलर, डंपर यासारख्या ट्रान्स्पोर्ट वाहनांना स्पीड गव्हर्नर बसविणे बंधनकारक आहे. परंतु त्यानंतरही या वाहनांचा वेग ताशी ८०च्या खाली येत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे भरधाव धावणाऱ्या वाहनांना लगाम लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलल्या जातील, अशी माहिती अमरावती आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांनी दिली. त्यांनी आज नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ कार्यालयाचा अतिरीक्त पदभार हाती घेतला.

   ‘लोकमत’शी बोलताना गिते म्हणाले, रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आवश्यक पावले उचलल्या जातील. वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी जनजागृतीसोबतच कारवाईची मोहिम हाती घेतली जाईल. रात्री वाहनांच्या तपासणीवर भर दिला जाईल. क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणाऱ्या ‘ओव्हरलोड’ वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल. शाळा सुरू होण्यापूर्वी स्कूल बसची फिटनेस मोहिम हाती घेतली जाईल. वाहनचालकांच्या काही समस्या असल्यास त्यांनी कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, असेही ते म्हणाले.

     यावेळी पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी डहाके यांच्यासह मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस