शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

सहायक अनुदानापासून सांस्कृतिक संस्था वर्षभरापासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 10:23 IST

प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फत सहायक अनुदान योजना अनेक वर्षापासून राबविण्यात येत आहे. मात्र, गेल्या वर्षभरात हे अनुदान राज्यातील एकाही संस्थेला प्राप्त झालेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फत सहायक अनुदान योजना अनेक वर्षापासून राबविण्यात येत आहे. मात्र, गेल्या वर्षभरात हे अनुदान राज्यातील एकाही संस्थेला प्राप्त झालेले नाही.सांस्कृतिक संचालनालयामार्फत हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिकांसोबतच सांस्कृतिक संस्थांना सहायक अनुदान योजनेच्या अर्जांची घोषणा केली जाते. दरवर्षी ऑगस्टमध्ये या योजना जाहीर केल्या जातात. साधारणत: फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत स्पर्धा आटोपतात आणि त्यानंतर हे अनुदान संबंधित संस्थांना दिले जाते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे सर्वच कामे खोळंबली आहेत.

शासनाच्या सर्वच संस्था कोरोनाविरूद्ध लढ्यात येनकेन प्रकारे सहभागी झाल्या. त्यामुळे २०१९मध्ये अनुदानासाठी मागविलेले अर्ज अद्याप निकाली काढण्यात आलेले नाहीत. सांस्कृतिक क्षेत्रात लोकप्रबोधन, मनोरंजन आणि लुप्त कलांना पुढे आणणाऱ्या संस्थांना अर्थसाहाय्य म्हणून संचालनालयामार्फत सहाय्यक अनुदान योजना राबविण्यात येते. अ गटासाठी दोन लाख, ब गटासाठी एक लाख आणि क गटासाठी ५० हजार रुपये असे अनुदान संस्थेच्या कार्याच्या दर्जानुसार दिले जाते. एकदा हे अनुदान प्राप्त झाले की पुढची तीन वर्षे हे अनुदान घेण्यास या संस्थेला परवानगी नसते. मात्र, २०१९मध्ये जारी झालेले हे अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही. यंदा अनुदानासाठीचे अर्ज संचालनालयाकडून अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे, राज्यातील अनेक संस्था अनुदान मिळण्याची वाट बघत आहेत.राज्य नाट्य स्पर्धांचे परतावेही नाहीत!अनुदान वगळता हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीतनाट्य आणि बालनाट्य स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या संस्थांना नियमानुसार मिळावयाचे भत्ते व परतावे अद्याप प्राप्त झालेले नाहीत. साधारणत: मार्च महिन्यातच ही पूर्तता होत असते. सांस्कृतिक संचालनालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, हे भत्ते व परतावे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात संस्थांना मिळणार आहेत.यंदा स्पर्धेवर टाच!हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे हे ६० वे वर्ष असून, स्पर्धेच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे. संचालनालयाने या वर्षी नाटकांचा विशेष महोत्सव आयोजित करण्याचा निर्धार केला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता यंदा स्पर्धेवर टाच आल्याचे स्पष्ट होत आहे.

 

टॅग्स :Theatreनाटक