शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

खुनी हल्ला करणारा आरोपी दोषीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:03 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खुनी हल्ला करणाऱ्या आरोपीला दोषी ठरवून त्याची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ही घटना पारशिवनी तालुक्यातील आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : शिक्षा कायम ठेवली

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खुनी हल्ला करणाऱ्या आरोपीला दोषी ठरवून त्याची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ही घटना पारशिवनी तालुक्यातील आहे.घनश्याम मारोती हिवसे (५२) असे आरोपीचे नाव असून, तो केराली येथील रहिवासी आहे. चिनबा गुलाब खंडार, असे जखमीचे नाव आहे. १६ आॅगस्ट २००४ रोजी आरोपी व त्याची पत्नी खंडारच्या शेतातून बैलबंडी नेत होते. शेतात सोयाबीनचे पीक होते. पीक खराब होऊ नये म्हणून खंडारने त्यांना टोकले. त्यावरून आरोपीने खंडारसोबत जोरदार भांडण केले. दुसऱ्या दिवशी खंडार आरोपीच्या घरापुढून जात होता. त्यावेळी आरोपीने त्याला टोकले व त्याच्या चेहºयावर वासल्याने वार केला. त्यामुळे खंडारच्या चेहऱ्यावर खोलवर जखम झाली. तो थोडक्यात बचावला.१५ एप्रिल २००६ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०७(खुनाचा प्रयत्न)अंतर्गत दोषी ठरवून, चार वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता, सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून आरोपीचे अपील फेटाळून लावले. आरोपीने ताकदीने वार केला होता. त्यामुळे जखमीचा मृत्यू होऊ शकला असता, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. आरोपी सध्या जामिनावर असून त्याला कारागृहात धाडण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे