शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पेट्रोल पंपावर वाहनचालकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 21:03 IST

Crowds of motorists at petrol pumps कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील पेट्रोल पंप सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच सुरू आहेत. वेळेच्या मर्यादेमुळे पंपावर ग्राहकांची गर्दी वाढली असून, फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. सध्या संसर्ग कमी झाल्याने १ जूनपासून पंप नियमित वेळेत सुरू करण्याची विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनची मागणी आहे.

ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा : संसर्गाची भीती, पंप नियमित वेळेत सुरू करावे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील पेट्रोल पंप सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच सुरू आहेत. वेळेच्या मर्यादेमुळे पंपावर ग्राहकांची गर्दी वाढली असून, फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. सध्या संसर्ग कमी झाल्याने १ जूनपासून पंप नियमित वेळेत सुरू करण्याची विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनची मागणी आहे.

लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू आहेत. याशिवाय अनेकांची प्रतिष्ठाने बंद आहेत. शिवाय वर्क फ्रॉम होममुळे रस्त्यावरील वाहतूक कमी झाली आहे. कामामुळे नोकरदार, उद्योगांमधील कामगार आणि व्यावसायिक सकाळी पेट्रोलचा भरणा करू शकत नाही. सायंकाळी ७ पर्यंत वेळेची मर्यादा असल्याने पंपावर वाहनचालकांची गर्दी वाढली आहे.

असोसिएशनचे उपाध्यक्ष बग्गा म्हणाले, इंधन जीवनावश्यक वस्तूच्या सूचित येते. वेळेच्या बंधनामुळे वाहनचालकांची होणारी गर्दी आणि कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाचा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वेळेचे निर्बंध लावण्याचा निर्णय योग्य आहे. अनेक जण नोकरीवरून घरी परतताना पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करतात. अशावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातात. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. पंपावर होणारी गर्दी नियंत्रणासाठी पंप संचालक आणि कर्मचारी प्रयत्नरत आहेत. पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी संपर्क होत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. वाहनचालकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. कोरोना संसर्गाचा धोका टळल्यानंतर प्रशासनातर्फे वेळेचे निर्बंध काढण्याची अपेक्षा आहे.

पेट्रोल आणि डिझेल विक्रीत घसरण

नागपुरात जवळपास ८५ पेट्रोल पंप असून, तेल कंपन्या आणि पोलीस प्रशासनातर्फे संचालित १० पेट्रोल पंप आहेत. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे पंपावर पेट्रोल आणि डिझेलची विक्री जवळपास ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. रुग्ण कमी झाल्यानंतर स्थिती सुधारत आहे. प्रत्येक पंपावर आता पेट्रोलची विक्री वाढत आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपnagpurनागपूर