शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सीताबर्डीत गर्दीमुळे वाढले कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 22:15 IST

जवळपास दोन महिन्यानंतर सीताबर्डी बाजारातील दुकाने सोमवारी सुरू झाली, पण ग्राहकांच्या गर्दीमुळे फि जिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मोदी नं. ३. हनुमान गल्ली आणि सीताबर्डी मुख्य मार्गावर मनपाच्या परिपत्रकाचे उल्लंघन करून सर्वच दुकाने सुरू झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जवळपास दोन महिन्यानंतर सीताबर्डी बाजारातील दुकाने सोमवारी सुरू झाली, पण ग्राहकांच्या गर्दीमुळे फि जिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मोदी नं. ३. हनुमान गल्ली आणि सीताबर्डी मुख्य मार्गावर मनपाच्या परिपत्रकाचे उल्लंघन करून सर्वच दुकाने सुरू झाली. मोबाईल विक्रीचे दुकानदार बाहेर दुरुस्तीचे बोर्ड लावून आत मोबाईलची विक्री करीत असल्याचे दिसत होते. पोलीस गर्दी पाहून परत गेले, पण मनपा अधिकाऱ्यांनी गर्दीची पाहणी केलीच नाही.दोन महिन्यानंतर दुकाने उघडल्याने दुकानदारांमध्ये उत्साह होता. या भागात जवळपास १५० दुकाने आहेत. त्यापैकी मोदी नं. ३, हनुमान गल्ली, जानकी टॉकीजसमोर आणि मुख्य मार्गावर मोबाईल, इलेक्ट्रिॉनिक्स, इलेक्ट्रिक, कपड्यांची दुकाने आहेत. यात मोबाईलची सर्वाधिक ६० ते ७० दुकाने आहेत. ही सर्वच दुकाने सोमवारी सुरू होती. मनपाच्या परिपत्रकात ‘स्टॅण्ड अलोन शॉप’ असा उल्लेख आहे. अर्थात एकाच रांगेत एकाच प्रकारच्या वस्तूची पाच दुकाने असतील तर त्यापैकी एकच दुकान सुरू ठेवण्याचा नियम आहे. पण या नियमाचे सपशेल उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. शिवाय निवासी भागात दुकान सुरू करण्याची परवानगी आहे. पण दुकानदारांनी सुरू करणे म्हणजे लॉकडाऊनचे उल्लंघन असल्याचे मत काहींनी व्यक्त केले.पूर्ण मार्केट उघडण्याची परवानगी नाहीमनपाच्या परिपत्रकानुसार संपूर्ण मार्केट उघडण्याची परवानगी नाही. त्यानंतर दुकानदारांनी दुकाने सुरू करून कायद्याचे उल्लंघन केले आहे. सर्वांनीच दुकाने सुरू करून गर्दी गोळा केली. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होण्याऐवजी जास्त वाढला आहे. मार्केट सुरू करताना मनपाचे अधिकारी हजर असायला हवे होते. पण आज तसे झाले नाही. प्रत्येकाने आपापल्या मर्जीने दुकाने सुरू करून कोरोनाला आमंत्रण दिले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपाने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सोमवारी रेडिमेड कपडे आणि सायकल विक्रीची दुकाने बंद होती.

टॅग्स :Sitabuldi square Nagpurसीताबर्डी चौकMarketबाजार