शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

डॉनच्या भेटीसाठी ‘भाई लोग’ची गर्दी

By admin | Updated: May 6, 2015 02:19 IST

वेळ दुपारी १२ ची. मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात शे-सव्वाशे ‘भाई’लोकांची गर्दी.

नरेश डोंगरे नागपूरवेळ दुपारी १२ ची. मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात शे-सव्वाशे ‘भाई’लोकांची गर्दी. तीन वकील अन् मोठ्या प्रमाणातील पोलिसांसोबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्याही नजरा कारागृहाच्या प्रवेशद्वाराकडे रोखलेल्या. रखरखत्या उन्हामुळे मिनिटागणिक अस्वस्थता तीव्र होत होती. दुपारचे १२.३० वाजले, १ वाजला. या दरम्यान प्रवेशद्वार ज्या ज्या वेळी उघडले गेले, त्या त्या वेळी ‘भाई लोग’ अन् छायाचित्रकारांची लगबग वाढली. मात्र आतमधून भलतीच व्यक्ती बाहेर येत असल्याचे पाहून सारेच ‘वो कब आनेवाले है’ असा प्रश्न एक दुसऱ्यांना विचारत होते. अखेर १.३५ वाजता आतमधून सिटी वाजली अन् बाहेरचे सर्व पोलीस ‘अलर्ट’ झाले. प्रवेशद्वारातील छोटे दार उघडले गेले अन् साऱ्यांचीच लगबग वाढली. भाईलोग धावतच पुढे गेले. पांढरा पायजमा, कुर्ता अन् कडक पांढरी टोपी घालून कारागृहाबाहेर आलेल्या व्यक्तीला काहींनी पदस्पर्श केला, काहींनी वाकून नमस्कार केला, तर काहींनी गळाभेट घेतली. कधीकाळी दगडी चाळीचा अनभिषिक्त सम्राट मानला जाणारा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी याला नगरसेवक कमलाकर जामसांडेकर याच्या हत्याकांडात कोर्टाने कारावासाची शिक्षा सुनावली. मुंबई, पुणे आणि त्यानंतर नागपूर कारागृहात पोहोचलेला डॉन गेल्या अडीच महिन्यांपासून येथील मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. त्याचा मुलगा महेश याचे ९ मे रोजी लग्न आहे. डॉन अरुण गवळीची सून नागपूरचीच असली तरी लग्न मात्र मुंबईत आहे. मुलाच्या लग्नसोहळ्यात उपस्थित राहता यावे म्हणून डॉनच्यावतीने पॅरोलसाठी कोर्टात याचिका सादर करण्यात आली होती. ती मंजूर झाल्यानंतरही तांत्रिक कारणामुळे डॉनची सुटका तीन दिवस लांबली. त्यामुळे आज सकाळपासूनच डॉनचे नातेवाईक तसेच डॉनच्या पर्सनल सिक्युरिटीतील ७५ खास साथीदार कारागृहाच्या बाहेर ताटकळत होते. डॉन के जलवे !दगडी चाळीचा बेताज बादशहा म्हणून ज्याची ओळख होती, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला जो आव्हान देत होता, मायानगरी मुंबई ज्याच्या नावाने थरथरत होती, तो अंडरवर्ल्ड डॉन अरुण गुलाब गवळी आता ‘अंडासेल’मध्ये राहातो. मात्र, त्याचे जलवे आजही तसेच आहे. मंगळवारी दुपारी तो कारागृहाबाहेर पडला अन् ‘डॉन’च्या पर्सनल सिक्युरिटीतील पाऊणशेवर भाईलोकांनी पोलिसांसकट साऱ्यांंनाच दूर सारत ‘डॉन’चे जलवे दाखवले. गेल्या चार दिवसांपासून साथीदारांना डॉनच्या सुटकेची प्रतीक्षा होती. साथीदारांमध्ये काही शार्प शूटरचाही समावेश होता.