नागपूर : लॉकडाऊनमुळे महानगरातील अनेक आऊटलेटचा फ्रेश स्टॉक विकू शकला नाही. तो ब्रॅण्डेड गारमेंट आणि फूटवेअरचा फ्रेश स्टॉक केवळ दोन दिवस अर्थात १७ जानेवारीपर्यंत विकला जाणार आहे. यात विंटर आणि समर गारमेंट आहेत. कोट्यवधी रुपयांचा स्टॉक उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे सभागृहात आयोजित सेलमध्ये विकण्यात येत असून ग्राहकांची गर्दी आहे.
सेलमध्ये महिला, पुरुष आणि लहानांकरिता जीन्स, ट्राऊझर्स, चिनोज पॅन्ट, कार्गो, १०० टक्के कॉटन शर्ट, टी-शर्ट, जॅकेट, बरमुडा, थ्री फोर्थ कॅप्री, कॉटन कुर्ती, प्लाझो, लोअर आणि इतर कपड्यांच्या अनेक व्हेरायटीज आहेत. अॅरो, लिव्हाईस, बफेलो, पेपे, पार्क एव्हेन्यू, कलर प्लस, बेनेटन, सेलियो, ऑक्टेव्ह, वॅन ह्युसेन, ब्लॅक बेरी, जॅक अॅण्ड जोन्स आदींसह अनेक नामांकित ब्रॅण्डेड गारमेंटची विस्तृत रेंज आहे. सेलमध्ये गारमेंटची विस्तृत रेंज किफायत किमतीत आहेत.
विंटरवेअरमध्ये प्रीमियम रेंज जसे पुरुषांसाठी जॅकेट, स्वेट शर्ट, कोट इत्यादी तसेच व्हीआयपी ट्रॉली सुटकेस, लोटो ट्रॅव्हल बॅग, ब्रा, गर्ल्स इनरवेअर व टॉप विक्रीस आहेत. याशिवाय पुरुष आणि महिलांसाठी स्पोर्ट शू, १०० टक्के लेदर शू, सॅण्डल, स्लीपर आणि अन्य फूटवेअर कमी किमतीत आहेत.
सेलमध्ये आलेले ग्राहक उमेश मोवाडे म्हणाले, सर्व कंपन्यांचे ब्रॅण्डेड गारमेंट एकाच छताखाली असल्याने मुबलक भावात आणि कमी वेळेत कुटुंबीयांसाठी खरेदी करता आली. कोरोना नियमांचे पालन करण्यात येत असून हॉल सॅनिटाईज्ड केला आहे. (वा.प्र.)