शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात विद्युत टॉवरमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 10:54 IST

कळमेश्वर तालुक्यातील काही भागात खासगी वीजनिर्मिती कंपनीच्यावतीने टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देखैरी शिवारातील प्रकार पूर्वसूचना न देता कामाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमेश्वर तालुक्यातील काही भागात खासगी वीजनिर्मिती कंपनीच्यावतीने टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. या कंपनीने खैरी (हरजी) शिवारात संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कोणतीही तोंडी अथवा लेखी पूर्वसूचना संबंधित शेतकऱ्यांना न देता त्यांच्या शेतात टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात केली. यात पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावर अधिकारी असंबद्ध उत्तरे देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतातील टॉवरमुळे शेतांची किंमत कमी होत असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली.परिणामी, पोलीस व महसूल विभागाने या संपूर्ण प्रकाराची पाहणी करावी आणि संबंधित शेतकऱ्यांना कंपनीकडून बाजारभावाप्रमाणे नुकसानभपाई मिळवून द्यावी तसेच शेतातील टॉवरच्या जागेचा मोबदला देण्यात यावा, मोबदला व नुकसानभरपाई मिळेपर्यंत काम बंद ठेवावे, शेतात ठेवण्यात आलेले टॉवरचे साहित्य तत्काळ उचलावे अशी मागणी दिलीप राऊत, नारायण बन्सोड, राहुल आंबोले, प्रभाकर आंबोले, सुभाष खंडागळे, जावेद शेख, तानाजी बावणे, झिंगूजी गोंड, सुधाकर भापकर, छत्रपती बुरबुरे, अनिल गोडे, राजेश तिडले, मनीष शेंडे, गणेश चिखले, हमीदा शेख, प्रमोद भापकर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली असून, कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी