शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

CronaVirus in nagpur : विदर्भात कोरोनाबाधितांची शतकाकडे वाटचाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 20:06 IST

नागपुरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रविवारी १४ रुग्ण आढळून आले असताना सोमवारी आणखी तीन तर यवतमाळमध्ये एक रुग्णाची नोंद झाली. या रुग्णांसह विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या ९६ झाली असून शतकाकडे वाटचाल आहे.

ठळक मुद्देरुग्णांची संख्या ९६ : नागपुरात तीन तर यवतमाळमध्ये एक पॉझिटिव्ह

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपर : नागपुरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रविवारी १४ रुग्ण आढळून आले असताना सोमवारी आणखी तीन तर यवतमाळमध्ये एक रुग्णाची नोंद झाली. या रुग्णांसह विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या ९६ झाली असून शतकाकडे वाटचाल आहे. नागपुरात आतापर्यंत ४७ तर यवतमाळमध्ये रुग्णाची संख्या १२ झाली आहे. विदर्भात नागपूर, बुलढाणा, गोंदिया, वाशिम, अमरावती, अकोला व यवतमाळ या सात जिल्ह्यातच कोरोना विषाणूची लागण आहे. नागपुरनंतर सर्वाधिक रुग्ण बुलढाण्यात आढळून आले आहेत. या जिल्ह्यात १७ रुग्ण व यातील एकाचा मृत्यूची नोंद आहे. अकोला जिल्ह्यात १३, यवतमाळ जिल्ह्यात १२, अमरावती जिल्ह्यात पाच रुग्ण व एक मृत्यू तर गोंदिया व वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. सोमवारी नागपुरात नोंद झालेले तिन्ही रुग्ण मरकजहुन आले होते. यांना ३१ मार्च रोजी आमदार निवासात क्वारंटाइन करण्यात आले. यांच्यासोबत असलेल्या चार रुग्णांचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्याने यांचेही नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. यात या तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) तपासलेल्या ३० नमुन्यापैकी यवतमाळ जिल्ह्याचे ११ नमुने तपासण्या आले. यात एक पॉझिटिव्ह तर १० नमुने निगीटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा ४० वर्षीय पुरुष आहे. बुलढाणा जिल्ह्यातील १७ नमुन्यामधून १० नमुने निगेटिव्ह आले. सात नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील तपासलेले दोन्ही नमुने निगेटिव्ह आले.- तीन मृत्य व ११रुग्ण बरे विदर्भात आतापर्यंत नोंद झालेल्या ९६ रुग्णांमधून ११ रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. यात नागपुरातील आठ तर अमरावती जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. खबरदारी म्हणून या रुग्णांना घरीच राहण्याचा सल्ल दिला आहे. कोरोनाबाधित मृतांची संख्या तीन आहे. यात नागपूर, बुलढाणा व अमरावतीमधील प्रत्येकी एक मृताचा समावेश आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVidarbhaविदर्भ