शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांवर टीका; गडकरींचे गायले गोडवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 06:05 IST

नागपुरातील व्यापाऱ्यांशी पवार यांनी बुधवारी संवाद साधला.  प्रत्येक भागाचा विकास करणे ही राज्य चालविणाऱ्यांची जबाबदारी असते. अनेकदा नेते जेथून येतात त्या भागाचा जास्त विकास होतो.

ठळक मुद्देनागपुरातील व्यापाऱ्यांशी पवार यांनी बुधवारी संवाद साधला.  प्रत्येक भागाचा विकास करणे ही राज्य चालविणाऱ्यांची जबाबदारी असते. अनेकदा नेते जेथून येतात त्या भागाचा जास्त विकास होतो

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विदर्भ दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. दुसरीकडे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यप्रणालीची त्यांनी प्रशंसा केली. एकाच पक्षाच्या दोन नेत्यांबाबत पवार यांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

नागपुरातील व्यापाऱ्यांशी पवार यांनी बुधवारी संवाद साधला.  प्रत्येक भागाचा विकास करणे ही राज्य चालविणाऱ्यांची जबाबदारी असते. अनेकदा नेते जेथून येतात त्या भागाचा जास्त विकास होतो. पाच वर्ष विदर्भाकडेच राज्याची सत्ता होती, मात्र असे असूनही येथील उद्योग क्षेत्राच्या समस्या दूर होऊ शकल्या नाहीत. मुळात समस्या सोडविण्यासाठी नेतृत्वात विकास दृष्टी असावी लागते, या शब्दांत पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.   यानंतर अचानक पवार यांनी ‘गिअर’ बदलला व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत गौरवोद्गार काढले. केंद्र सरकारमध्ये काही नेते असे आहेत जे पक्ष, प्रांत यांचा  विचार न करता पूर्ण देशाच्या विकासाचा विचार करतात. अगदी विरोधी पक्षाचा खासदार असो किंवा संसदेतील कुठलाही सदस्य, त्यांची समस्या दूर करण्याची इच्छा दाखविणारे कमी मंत्री आहेत. त्यात नितीन गडकरी यांचे नाव अग्रक्रमाने येते. त्यांच्यासमोर समस्या आल्या की, त्याचा तोडगा ते काढणार, असे पवार म्हणाले.

शरद पवार यांनी असे काढले चिमटेnराज्यात झालेल्या हिंसाचारामागे मतांच्या ध्रुवीकरणाचे षडयंत्र असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यावर पवार यांनी फडणवीस यांना चिमटा काढला. nचंद्रकांत पाटील असे बोलले असते तर, मला काही वाटले नसते, परंतु फडणवीसांकडून असे वक्तव्य आल्याने आश्चर्य वाटले. सत्ता गेल्यावर माणसे किती अस्वस्थ होतात, हे दिसून येते, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस