शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

‘स्वाईन फ्लू’ बैठकीपुरतेच गंभीर

By admin | Updated: February 10, 2015 00:53 IST

मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या दोन स्वाईन फ्लू संशयितांच्या रुग्णांचा मृत्यू रविवारी झाला, परंतु आज सोमवारी पाठविण्यात आलेल्या या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणीच झाली नाही.

दोन मृत संशयितांचे नमुने तपासलेच नाही नागपूर : मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या दोन स्वाईन फ्लू संशयितांच्या रुग्णांचा मृत्यू रविवारी झाला, परंतु आज सोमवारी पाठविण्यात आलेल्या या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणीच झाली नाही. विशेष म्हणजे, मेयोच्या प्रयोगशाळेत दिवसभरात फक्त १३ नमुनेच तपासले जातात. सोमवारी मेडिकलकडून १८ नमुने पाठविण्यात आले होते, यातील फक्त सात नमुने तपासण्यात आले. यातील सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याच्या तुलनेत उपराजधानीत स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येत असताना, प्रशासन मात्र बैठकीपुरतेच गंभीर असल्याचे या वास्तवातून समोर आले आहे. मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात रविवारी रात्री ९ वाजता बेसा येथील एका ३५ वर्षीय रुग्णाचा तर याच रात्री १.३० वाजता छिंदवाडा येथील ४० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. रविवारी मेयोची प्रयोगशाळा बंद राहत असल्याने सोमवारी या दोन मृतांसह १८ संशयित रुग्णांचे नमुने पाठविण्यात आले. परंतु यातील फक्त सातच नमुने तपासण्यात आले. परिणामी संशयित रुग्णांवरील उपचाराची दिशा ठरविण्यास डॉक्टर अडचणीत आले आहेत तर मृताचे नातेवाईक दहशतीच्या वातावरणात आहेत.दोन मुलांना स्वाईन फ्लू उपराजधानीत २००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. परंतु यावर्षी पहिल्यांदाच पाच वर्षांखालील दोन मुलांना स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मुलांमध्ये स्वाईन फ्लू दिसून येणे हे आजारात वाढ होण्याचे संकेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात सहा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन वर्षांची मुलगी, पाच वर्षांचा मुलगा यांच्यासह ६३ व २४ वर्षांची महिला तर ५० व ४४ वर्षांचे पुरुष आहेत. सध्या मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात २४ रुग्ण उपचार घेत आहेत. (प्रतिनिधी)ंहायकोर्टात अर्जस्वाईन फ्लू या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे व्यावसायिक अनिल आग्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. आग्रे यांची डेंग्यू आजारासंदर्भातील जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्यात हा अर्ज करून याचिकेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. अर्जात महानगरपालिका, मेडिकल व मेयो रुग्णालयाला प्रतिवादी करण्यात आले आहे. स्वाईन फ्लूचा प्रसार थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु प्रशासन वेगवान पावले उचलत नसल्यामुळे स्वाईन फ्लूने अनेकांचे बळी घेतले, असे अर्जदाराचे म्हणणे आहे. ताज्या आकडेवारीनुसार नागपूर विभागात स्वाईन फ्लूने २२ रुग्णांचे बळी घेतले आहेत.वैज्ञानिक विश्लेषणाची गरज मेडिकलमध्ये आतापर्यंत स्वाईन फ्लूचे ४० रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये २८ महिला आहेत तर १२ पुरुष आहेत. तज्ज्ञांच्या मते महिलामंध्ये स्वाईन फ्लू वाढण्याला घेऊन वैज्ञानिक विश्लेषण होण्याची गरज आहे. सोबतच मृतांमध्ये ३० वर्षांखालील चार रुग्णांचा, ३० ते ४० वर्षांतील चार रुग्णांचा तर ५० ते ६० वर्षांतील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वयाच्या चाळीशीपर्यंत मनुष्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहत असतानाही सर्वात जास्त याच वयाच्या आतील रुग्णांचा मृत्यू झाल्याने याविषयीही विश्लेषण होणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.