शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

शिक्षकांना वेतन न देणाऱ्या शाळा संचालकांवर येणार संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 22:28 IST

लॉकडाऊनचे कारण पुढे करून शाळेतील कार्यरत शिक्षकांना वेतन देण्यात चालढकल करणाऱ्या विनाअनुदानित शाळांच्या संचालकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. यासंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देविभागीय शिक्षण उपसंचालकांचे आदेश : शिक्षणाधिकाऱ्यांना दिले कारवाईचे निर्देश, सीबीएससी शाळा संचालकांवर होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लॉकडाऊनचे कारण पुढे करून शाळेतील कार्यरत शिक्षकांना वेतन देण्यात चालढकल करणाऱ्या विनाअनुदानित शाळांच्या संचालकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. यासंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत.राज्य शिक्षण मंडळाशी संबंधित असलेल्या सर्व शाळा या कारवाईच्या कक्षेत येणार आहेत. तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) सोबत संबंधित असलेले सर्व संस्थाचालकसुद्धा यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे काम नाही तर पगार नाही, या धर्तीवर काही संस्थांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्च, एप्रिल महिन्याचे वेतन देण्याचे टाळले. यामुळे शिक्षकांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.

शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली आहे. संस्थाचालकांच्या या निर्णयामुळे अनेक शिक्षकांवर उपासमारीची पाळी आली आहे. या परिस्थितीत शिक्षकांनी प्राचार्यांशी संपर्क साधून वेतनाची मागणी केली. मात्र काही संस्थाचालकांनी ही विनंती फेटाळली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही शाळांनी शिक्षकांना नियमित वेतन दिले. मात्र बहुतेक शाळांनी वेतन देण्यास नकार दिला. वेतन न देणाऱ्यां शाळांमध्ये खासगी सीबीएससी शाळा व कॉन्व्हेंट शाळांच्या संस्थाचालकांची संख्या अधिक आहे.या मुद्यावरून मागील काही दिवसांपूर्वी शिक्षकांनी विभागीय शिक्षण संचालकांकडे तक्रार केली होती. या तक्रारींमध्ये वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे

कोरोनाच्या संक्रमणामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे १८ मार्चपासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. शाळा व महाविद्यालयांमधील परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत जाणे बंद केले होते. 

कारवाईची भीती नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागाच्या निर्देशानंतरही काही संस्थाचालक वेतन देण्याच्या मानसिकतेत नाहीत. संस्थेला सरकारकडून काही अनुदान मिळत नाही, त्यामुळे हा खर्च कसा चालवावा, असा त्यांचा प्रश्न असून शिक्षणाधिकाºयांना अशाप्रकारच्या कारवाईचे अधिकार नाहीत, असेही संस्थाचालकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक